Afghanistan shakes again mosque bombing Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तान पुन्हा हादरले, मशिदीत बॉम्बस्फोट

शुक्रवारी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची जमीन पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली आहे.

दैनिक गोमन्तक

शुक्रवारी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची (Afghanistan) जमीन पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंदुज जिल्ह्यात असलेल्या मशिदीमध्ये (Mosque) झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. (Afghanistan shakes again mosque bombing)

अफगाणिस्तानचे कुंदुज इमाम साहिब, कुंदुझ जिल्ह्याचे पोलिस प्रमुख हाफिज उमर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना आज दुपारी मावली सिकंदर मशिदीत घडली आहे. मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावेळी काही लोक मशिदीमध्ये नमाज अदा करत होते, अचानक झालेल्या बॉम्बस्फोटामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाली आणि 30 हून अधिक लोक ठार झाले तर काही जखमी झाले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.

उत्तर अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरातील शिया मशिदीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान 10 उपासक ठार तर 40 जण जखमी झाले आहेत. तालिबान राजवटीने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून स्फोट आणि हल्ले या देशात नित्याचीच बाब झाली आहे आदल्या दिवशी काबूलमध्ये आणखी एका घटनेत दोन मुले जखमी झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT