TS Tirumurti Dainik Gomantak
ग्लोबल

'अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक व्यवस्था स्थापन व्हावी'

ही प्रणाली अफगाण समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारी असावी, अशी प्रतिक्रीया भारताने (India) नोंदविली आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत (UN Security Council) भारताने आंतरराष्ट्रीय समुदाय (International Community) आणि अफगाणिस्तानच्या शेजारी असणाऱ्या देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पक्षपाती हितसंबंधांव्यतरीक्त सर्वसमावेशक शासनप्रणाली स्थापन करता येईल. ही प्रणाली अफगाण समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारी असावी, अशी प्रतिक्रीया भारताने नोंदविली आहे. तालिबानने (Taliban) सत्ता ताब्यात घेतल्यानंतर जाहीर केलेल्या अंतरिम सरकारमध्ये महिला आणि अल्पसंख्याक समुदायाला सरकारमध्ये स्थान दिलेले नाही.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती (TS Tirumurti) यांनी बुधवारी अफगाणिस्तानवरील चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सांगितले की, 'भारत अफगाणिस्तानातील (India-Afghanistan) लोकांना अत्यावश्यक सहाय्याची जलद तरतूद करण्याच्या दिशेने काम करेल.' त्याचबरोबर इतर भागधारकांशीही समन्वय साधण्यास आम्ही इच्छुक असल्याचेही भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानने अलिकडच्या वर्षांत खूप रक्तपात आणि हिंसाचार पाहिला आहे, यावर जोर देऊन त्रिमूर्ती म्हणाले, अफगाणिस्तानच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला अन्न असुरक्षिततेचा सध्या सामना करावा लागत आहे. लोक आपत्कालीन स्तरावर संकटांचा सामना करत आहेत. मूलभूत अन्न गरजा पूर्ण करण्यासाठी अफगाण लोकांना तातडीने मानवतावादी मदतीची आवश्यकता आहे.

अडकलेल्या लोकांची सुटका करणे हे आमचे प्राधान्य

गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानच्या विकासात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचेही यावेळी राजदूतांनी सांगितले. त्रिमूर्ती पुढे म्हणाले, भारत हजारो अफगाण पुरुष आणि महिलांना त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देत आहे. ते पुढे म्हणाले की, अडकलेल्या लोकांची मुक्तता करण्यावर आमचा जास्तीत जास्त भार असेल. अफगाणिस्तानवरील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या तिसर्‍या प्रादेशिक सुरक्षा संवादामध्ये स्वीकारण्यात आलेल्या दिल्ली घोषणेस प्रादेशिक सहमती दर्शविण्यात आली आहे. राजदूतांनी अफगाणिस्तानवरील सर्वांगीण मुद्यावर भर दिला. तसेच त्यांनी अफगाणिस्तानसह प्रमुख भागधारकांचेही स्वागत केले आहे.

पुढील वर्षी मार्चमध्ये अफगाणिस्तानच्या भवितव्यावर चर्चा होणार

त्रिमूर्ती म्हणाले, जेव्हा परिषद मार्च 2022 मध्ये अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र सहाय्यता मिशन (UNAMA) च्या भविष्यावर निर्णय घेईल तेव्हा त्याचे लक्ष अफगाण लोकांच्या कल्याणावर आणि आकांक्षांवर केंद्रित केले पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बुधवारी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर बैठक बोलावली. या बैठकीत विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तत्पूर्वी, भारतात अफगाणिस्तानच्या संकटावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT