Representative Image
Representative Image Dainik Gomantak
ग्लोबल

काबुल विमानतळावर 150 भारतीय नागरिक सुरक्षित; कागपत्रांसाठी झाली चौकशी

दैनिक गोमन्तक

काबूलवर (Kabul) ताबा मिळवल्यानंतर तालिबान (Taliban) भारतीयांच्याविरोधातल्या आपल्या कारवाया थांबवत नसल्याचे दिसते आहे. मिळाले माहितीनुसार शनिवारी सकाळी सुमारे 150 भारतीयांना तालिबानने काबूल विमानतळाच्या गेटबाहेर पकडले आणि त्यांना ट्रकने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. मोठ्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. अफगाणिस्तानातून 85 भारतीयांना हवाई दलाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले असुन उर्वरित भारतीयांनाही मायदेशी आणण्याची तयारी सुरू आहे.

तालिबानने पकडलेल्या सुमारे 150 भारतीयांचे अपहरण झाल्याचे वृत्त आज सकाळी आले होते, त्यानंतर या नागरिकांना सोडण्यात आले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आता ते सर्व नागरिकांना काबूल विमानतळावरु भारतात आणले जात आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळाबाहेर मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय नागरिकांना दस्तऐवजांची चौकशी आणि तपासणीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

यापूर्वी काबूलमधील काही बातम्यांमधून असा दावा करण्यात आला होता की, तालिबानने भारतीयांसह 150 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. काबुलस्थित न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर शरीफ हसन यांनी तालिबानच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की तालिबान्यांनी भारतीय नागरिकांचे अपहरण केल्याचा तो दावा फेटाळून लावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT