Afghan Taliban And Pakistan Relations: सध्या पाकिस्तान अनेक गंभीर समस्यांनी घेरला आहे. आर्थिक संकट हे एक आव्हान असताना तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) दहशतवादी हल्ले करत आहे.
या सगळ्यात अफगाण तालिबानसोबतचे बिघडलेले संबंध हाही पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न आहे. काबूल ताब्यात घेतल्यापासून अफगाण तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील वाद वाढत चालला आहे. (Pakistan Economic Crisis)
दरम्यान, आता बातम्या येत आहेत की, अफगाण तालिबानच्या अधिकार्यांनी रविवारी इस्लामाबादवर आपल्या वचनबद्धतेपासून दूर गेल्याचा आरोप करत पाकिस्तानसोबतचा (Pakistan) एक ट्रांझिट ट्रेड आणि सीमा क्रॉसिंग पॉइंट बंद केला.
'द डॉन'च्या वृत्तानुसार, तोरखमच्या अफगाण तालिबान कमिशनरने सांगितले की, सीमा क्रॉसिंग पॉइंट आणि ट्रांझिट ट्रेड बंद करण्यात आला आहे.
तोरखममधील तालिबान आयुक्त मौलवी मोहम्मद सिद्दीकी यांनी ट्विट केले की, "पाकिस्तानने आपल्या वचनबद्धतेचे पालन केले नाही म्हणून (आमच्या) नेतृत्वाच्या सूचनेनुसार प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे." त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना सीमापार प्रवास टाळण्याचा सल्ला दिला.
तथापि, इस्लामाबादने कोणत्या वचनबद्धतेचे उल्लंघन केले आहे, हे तालिबान अधिकाऱ्याने स्पष्ट केले नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सुचवण्यात आले आहे की, पाकिस्तानमध्ये उपचारासाठी असलेल्या अफगाण रुग्णांच्या प्रवासावर अघोषित बंदी घातल्याने तालिबान संतप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि अफगाण तालिबान (Taliban) यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनत चालले आहेत.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले की, जर अंतरिम अफगाण सरकारने आपल्या हद्दीतून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना सामोरे जाण्याची "इच्छा आणि क्षमता" दाखवली तर दहशतवाद समूळ नष्ट होईल. जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.