Pakistan Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Terrorist: पाकिस्तानात आता CRPF वरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ढेर; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा एकापाठोपाठ होतोय खात्मा

Pakistan Terrorist: भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अदनान अहमद याला पाकिस्तानात ठार केल्याची बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Pakistan Terrorist: भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अदनान अहमद याला पाकिस्तानात ठार केल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली आहे.

लष्कर-ए-तैयबामध्ये महत्त्वाच्या पदावर असलेला अदनान 2016 मध्ये पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात आठ जवान शहीद तर 22 जण जखमी झाले होते.

2015 च्या उधमपूर दहशतवादी हल्ल्यातही अदनानचा हात होता. याशिवाय, तो पाकिस्तानमध्ये नवीन दहशतवादी तयार करत होता. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा येथे आत्मघाती हल्ले घडवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कराच्या छावण्यांमध्ये नव्याने भरती झालेल्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती.

दुचाकीस्वारीवरुन हल्लेखोर आले, गोळीबार केला आणि निघून गेले

दरम्यान, भारताचा (India) मोस्ट वाँटेड दहशतवादी पाकिस्तानमध्ये मारला गेल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या दोन वर्षांत असे अनेक दहशतवादी अज्ञात हल्लेखोरांचे बळी ठरले आहेत. मात्र, पाकिस्तानने या हत्यांबाबत मौन बाळगले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे प्राण गमावलेले जवळपास सर्वच दहशतवादी लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.

दहशतवाद्यांच्या हत्येची ही मालिका लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या जिवावरील अयशस्वी प्रयत्नानंतर सुरु झाली. असाच प्रकार या दहशतवाद्यांच्या खात्मातही दिसून आला आहे. प्रत्येक प्रकरणात दुचाकीस्वार अज्ञात हल्लेखोर भारतात दहशतवाद पसरवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची हत्या करतात.

काही प्रमुख दहशतवादी पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांचे बळी ठरले

5 डिसेंबर रोजी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी (Terrorist) हंजला अदनान याची कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 2015 मध्ये उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा अदनान हा मास्टरमाईंड होता.

13 नोव्हेंबर रोजी जैश-ए-मोहम्मदचा नेता मौलाना रहीमुल्ला तारिक याची कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना ही हत्या झाली.

9 नोव्हेंबर रोजी खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या भर्ती सेलचा प्रमुख अक्रम खान उर्फ ​​गाझी मारला गेला. अक्रम खान यांनी पाकिस्तानमध्ये अनेक भारतविरोधी भाषणे दिली होती.

5 नोव्हेंबरला लष्कराचा प्रमुख नेता ख्वाजा शाहिदचा मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला होता. सुंजवान येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.

ऑक्टोबरमध्ये, शाहिद लतीफ, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि 2016 च्या पठाणकोट हल्ल्याचा कथित सूत्रधार, सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांचा बळी ठरला.

सप्टेंबरमध्ये, धनगरी दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड, रियाझ अहमद, लष्करचा मौलाना झियाउर रहमान आणि लष्करचा स्वतःचा दहशतवादी मुफ्ती कैसर फारुकी हे अज्ञात हल्लेखोरांचे बळी ठरले.

ऑगस्टमध्ये जमात-उद-दावाचा दहशतवादी मुल्ला सरदार हुसैन अरैन, मे महिन्यात खलिस्तान कमांडो फोर्सचा नेता परमजीत सिंग पंजावार आणि मार्चमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा बशीर अहमद पीर मारला गेला.

मार्चमध्येच कुख्यात जिहादी सय्यद नूर आणि जैश-ए-मोहम्मद जहूर इब्राहिम मारले गेले. फेब्रुवारीमध्ये अल-बद्र-मुजाहिद्दीनच्या सय्यद खालिद रझा याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT