Acting Prime Minister Anwar-ul-Haq Qakar banned the celebration of the New Year in Pakistan. Dainik Gomantak
ग्लोबल

New Year Celebration वर पाकिस्तानात बंदी, सरकारच्या निर्णयामागे 'हे' आहे कारण

Pakistan: पाकिस्तान पॅलेस्टाईनला वेळेवर मदत देण्यासाठी आणि गाझामध्ये उपस्थित जखमींना बाहेर काढण्यासाठी जॉर्डन आणि इजिप्तशी चर्चा करत आहे.

Ashutosh Masgaunde

Acting Prime Minister Anwar-ul-Haq Qakar banned the celebration of the New Year in Pakistan to express solidarity with the victims of the Israel-Hamas war:

पाकिस्तानमध्ये सरकारने नवीन वर्ष साजरे करण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी उत्सवावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गाझामधील इस्त्रायल-हमास युद्धातील पीडित लोकांशी एकता व्यक्त करण्यासाठी देशात नवीन वर्ष साजरे करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

देशाला दिलेल्या संक्षिप्त भाषणात काकर यांनी आपल्या देशवासियांना पॅलेस्टिनींसोबत एकता दाखवण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, "पॅलेस्टाईनमधील गंभीर चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन आणि आपल्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींशी एकजुटीने, सरकारने नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर कडक बंदी घालत आहोत."

काकर म्हणाले की, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली बॉम्बस्फोट सुरू झाल्यापासून, इस्रायली सैन्याने "हिंसा आणि अन्यायाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि अंदाजे 9,000 मुलांसह 21,000 हून अधिक पॅलेस्टिनींना ठार केले आहे." गाझा आणि वेस्ट बँक मधील निष्पाप मुलांचे आणि पॅलेस्टिनी हत्याकांडामुळे मुस्लिम जग खूप दुःखी आहे.

काकर म्हणाले की, पाकिस्तानने पॅलेस्टाईनला दोन मदत पॅकेज पाठवले असून तिसरे पॅकेज तयार केले जात आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान पॅलेस्टाईनला वेळेवर मदत देण्यासाठी आणि गाझामध्ये उपस्थित जखमींना बाहेर काढण्यासाठी जॉर्डन आणि इजिप्तशी चर्चा करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT