Abdel Fattah al-Burhan
Abdel Fattah al-Burhan Dainik Gomantak
ग्लोबल

'सुदानला गृहयुद्धापासून वाचवण्यासाठी तख्तापालट केला'

दैनिक गोमन्तक

सुदानमधील (Sudan) नागरी सरकार उलथवून लावत लष्करांनी आपल्या हातामध्ये सत्ता घेतली आहे. यातच आता सुदानचे सर्वोच्च जनरल अब्देल फताह अल-बुरहान (Abdel Fattah al-Burhan) यांनी लष्करी उठावाचा बचाव करत म्हटले की, देशाला गृहयुद्धापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान अब्दल्लाह हमडोक (Prime Minister Abdullah Hamdok) यांचे सरकार उलथून टाकावे लागले. दरम्यान, सत्तापालटाच्या दुसऱ्या दिवसापासून राजधानीत नागरिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने सुरु केली. जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेरम्यान सांगितले की, ''हमदोक सध्या नजरकैदेत असून आणि त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचविण्यात आलेली नाही.''

राजकारण्यांची भूमिका पूर्णपणे लष्कराच्या विरोधात गेल्याने लष्कराला सत्तेची लगाम स्वत:च्या हातात घेणे भाग पडले, असही ते म्हणाले. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवार झालेल्या सत्तापालटानंतर झालेल्या हिंसक संघर्षात सात जणांचा मृत्यू झाला आहे. खार्तूम (Khartoum) आणि ओमदुरमन (Omdurman) या नाईल नदीच्या काठावर वसलेल्या शहरांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. दुकाने बंद असून आंदोलकांनी जाळलेल्या टायरचा धूर रस्त्यावर दिसत होता. सुदानमध्ये लष्कराने उठाव केला आहे. सोमवारी रात्री लष्कराने सरकारकडून सत्ता हिसकावून घेत आपली सत्ता देशात स्थापन केली. यानंतर देशातील नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. या निदर्शनांमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 140 लोक जखमी झाले. नागरी सरकारचा तख्तापालट करणारे मुख्य सूत्रधार जनरल अब्दुल फताह अल-बुरहान यांनी लष्करी-नागरी सत्ताधारी समितीही विसर्जित केली. हुकूमशहा ओमर अल-बशीर (Omar al-Bashir) यांना सत्तेवरुन हटवल्यानंतर देशात लोकशाही लागू करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी या परिषदेची स्थापना करण्यात आली होती.

2023 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता सोपवली जाईल

बुरहानने देशात आणीबाणी लागू केली आहे. लष्कराला देशाचे रक्षण करावे लागते, असे त्यांनी म्हटले आहे. जुलै 2023 मध्ये निवडणुका होतील आणि त्यानंतर निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता सोपवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. देश ज्या टप्प्यातून जात आहे, त्यामुळे तरुणांची स्वप्ने आणि देशाच्या आशा धोक्यात आल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT