Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: हिंसक संघर्षात खासदाराचा मृत्यू, अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) राजधानीत झालेल्या हिंसक संघर्षात सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या राजधानीत झालेल्या हिंसक संघर्षात सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तत्पूर्वी, या संघर्षानंतर लगेचच पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची बातमी आली होती. (A ruling party MP has been killed in a violent clash in the Sri Lankan capital)

दरम्यान, महिंदा राजपक्षे यांचे समर्थक आणि सरकारविरोधी (Government) निदर्शक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 78 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजधानी कोलंबोमध्ये (Colombo) स्थानिक पोलिसांनी अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. सोमवारी सरकारचे समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेतील अमेरिकेच्या (America) राजदूत ज्युली चुंग यांनी सोमवारी या हिंसक संघर्षांचा निषेध केला आहे. सरकार समर्थकांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला.

तसेच, आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या चकमकींमध्ये 20 जण जखमी झाले आहेत. एएफपीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'राजपक्षे यांच्या समर्थकांनी 9 एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनाबाहेर बसलेल्या निशस्त्र निदर्शकांवर लाठीहल्ला केला.'

आधीच्या अहवालानुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी कबूल केले आहे की, 'लोकांच्या निषेधानंतर देशातील राजकीय आणि आर्थिक संकटावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. या संकटाचा देशाच्या पर्यटनावर (Tourism) विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कारखाने बंद होण्यापूर्वीच देशावरील आर्थिक बोजा वाढला होता.'

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री प्रसन्ना रणतुंग, नाल्का गोदाहेवा आणि रमेश पाथिराना यांनी महिंदा राजपक्षे यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तथापि, सहकारी मंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री विमलपुरा दिसानायके म्हणाले की, 'महिंदाचा राजीनामा देशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी निरुपयोगी ठरेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

SCROLL FOR NEXT