Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

रशियामध्ये प्रवासी विमान कोसळले, 16 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता!

विमानात 21 पॅराशूट डायव्हर्ससह 23 लोक होते. 23 पैकी 7 लोकांना वाचवण्यात यश आले.

दैनिक गोमन्तक

रशियाच्या (Russia) तातारस्तान भागातील (Tatarstan region) मेनजेलिंस्क (Menzelinsk) येथे रविवारी एक विमान कोसळले (Plane Crash in Russia). विमानात 21 पॅराशूट डायव्हर्ससह 23 लोक होते. 23 पैकी 7 लोकांना वाचवण्यात यश आले. रशियन वृत्तसंस्था तासने यासंबंधीची माहिती दिली. तासच्या अहवालानुसार, आपात स्थिति मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, पॅराशूट डाइवर्सना घेऊन जाणारे विमान रविवारी मध्य रशियामध्ये कोसळले. या अपघातात 16 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. याआधीही रशियाच्या दुर्गम भागात विमान अपघात झाले आहेत.

आपत्कालीन सेवांमधील एका सूत्राने टीएएसला सांगितले की, लेट एल -410 टर्बोलेट विमान मेनजेलिंस्क शहरात कोसळले. हे एरो क्लबच्या मालकीचे होते. सूत्रानुसार, मॉस्को वेळेनुसार सकाळी 09:11 च्या सुमारास विमान कोसळले. या विमानात 23 लोक होते. रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या प्रेस सेवेने टीएएसला सांगितले की, विमानातील सात जणांची सुटका करण्यात आली आहे. आणखी चार जणांना अग्निशमन आणि बचाव पथकाने वाचवले असून इतर प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान सात जणांना वाचवण्यात आले आहे.

प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु

रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या मते, 16 लोकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही, असे मानण्यात येत आहे की, त्यांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 23 लोक होते, त्यापैकी 21 पॅराशूट डाइवर्स होते. याआधी आपत्कालीन सेवांनी या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. तर 19 लोकांच्या मृत्यूची अद्याप पुष्टी झालेली नाही. विमानातील लोकांना वाचवण्यासाठी एमआय -8 हेलिकॉप्टर (Mi-8 helicopter) तैनात करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये असलेले बचावकर्मी विमानापर्यंत पोहोचत आहेत.

जुन्या विमानांमुळे अपघात होतात

याआधी, गेल्या महिन्यात 23 रोजी रशियाच्या सुदूर पूर्वेला अपघात झालेल्या अँटोनोव्ह एन -26 या प्रवासी विमानातील सहा जण ठार झाले होते. हे विमान एका दिवसापूर्वी रडारवरुन गायब झाले होते. आपत्कालीन सेवा स्रोतांचा हवाला देत रशियन वृत्तसंस्थांनी गुरुवारी विमानात बसलेल्यांच्या मृत्यूची माहिती दिली. जुन्या विमानांमुळे हा अपघात झाला. प्राथमिक तपासाच्या आकडेवारीनुसार, रशियन सुदूर पूर्वेतील खाबरोव्स्क प्रदेशातील रिजर्व क्षेत्रामध्ये हे विमान कोसळले.

अलिकडच्या वर्षांत रशियन विमान सुरक्षा मानकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. परंतु विमान अपघात सामान्य झाले आहेत, विशेषत: दुर्गम भागात. यातील बहुतेक अपघात जुन्या विमानांमुळे होतात, जे अनेकदा रडारवरुन गायब होतात आणि जंगलांमध्ये कोसळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT