Volcano Dainik Gomantak
ग्लोबल

Philippines: ज्वालामुखीमध्ये जबरदस्त स्फोट, हजारो लोकांना सोडावी लागली घरे

फिलिपाइन्समध्ये (Philippines) ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो लोकांना संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

जपान पाठोपाठ फिलीपाईन्सलाही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठा धक्का बसला आहे. याच पाश्वभूमीवर फिलिपाइन्समध्ये (Philippines) झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. स्फोटानंतर गॅस, राख आणि कचरा सर्वत्र पसरला आहे. फिलिपाइन्समधील ताल ज्वालामुखीतून राखेचे मोठे ढग उठू लागले आहेत, त्यामुळे राजधानी मनिलाजवळील अनेक भागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी (फिव्हॉल्क्स) ने सांगितले की, 'ज्वालामुखीतून निघणारा धूर आणि राखेचे ढग आकाशात 1,500 मीटर किंवा 1.5 किलोमीटरपर्यंत उंचावत असल्याचे दिसले. गॅस, राख आणि वेगाने वाहणाऱ्या लावा प्रवाहामुळे लोकांना बाहेर काढले पाहिजे.' (A massive volcanic eruption in the Philippines has forced thousands of people to flee their homes)

दरम्यान, ज्वालामुखीचा आणखी उद्रेक झाल्यास त्सुनामी येऊ शकते, असेही फिवोल्क्स यांनी सांगितले आहे. फिवोल्क्सने लेव्हल थ्री अलर्ट जारी केला होता, याचा अर्थ आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यात असेही म्हटले आहे की, 'ताल ज्वालामुखीबाबत लेव्हल थ्री अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, ताल ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेटातील बिलीबिनवांग, बन्यागा आणि बटांगसचे अ‍ॅगोन्सिलो शहरांना खाली करण्याची वेळ आली आहे. ताल सरोवराशेजारील सर्व कामकाज थांबवण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे विमानांना या भागात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ताल ज्वालामुखी हा फिलीपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक

ताल ज्वालामुखीच्या शिखरावर ताल सरोवर बांधण्यात आले आहे. मात्र ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसररातील नागरिकांना घरे सोडावी लागली आहेत. इथे राहणाऱ्या लोकांना तीन वर्षांत तिसऱ्यांदा घरे सोडण्याची वेळ आली आहे. ताल ज्वालामुखी हा फिलीपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, 'ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर चिखलाचा पाऊस पडत होता. या मातीतून प्रचंड दुर्गंधी येत असून श्वास घेण्यास त्रास होत आहे.' अधिकृत आकडेवारीनुसार, इथे 12 हजार लोक राहतात.

रिंग ऑफ फायरमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो

लोकांना जास्त जोखीम असलेल्या भागात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने पोलीसांना तैनात केले आहे. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी विमान कंपन्या आणि वैमानिकांना या परिसरात जाण्यास मनाई केली आहे. फिलिपाइन्सला ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंपाचा वारंवार त्रास सहन करावा लागतो, कारण ते पॅसिफिक महासागराच्या 'रिंग ऑफ फायर' जवळ आहे. बहुतेक सक्रिय ज्वालामुखी आणि भूकंप रिंग ऑफ फायर जवळ नोंदवले जातात. पृथ्वीवरील 75 टक्के ज्वालामुखी म्हणजेच 450 पेक्षा जास्त ज्वालामुखी रिंग ऑफ फायरच्या बाजूलाच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT