उत्तर कोरियाची ट्रेन का बनली रहस्य; बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणाशी ड्रॅगनचा...

उत्तर कोरियाच्या (North Korea) एका ट्रेनने दोन्ही देशांमधील यालू नदीवरील पुलावरुन चीनची सीमा ओलांडली.
North Korea
North Korea Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर कोरियाने सोमवारी जपानच्या समुद्रात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याच्या एक दिवस आधी, उत्तर कोरियाच्या एका ट्रेनने दोन्ही देशांमधील यालू नदीवरील पुलावरुन चीनची सीमा ओलांडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन चीनच्या (China) दांडोंग शहरात गेली होती. मात्र, या ट्रेनमध्ये काय होते आणि ती परत कशासाठी आली याची खात्री करण्यात आलेली नाही. त्यामुळे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राशी चीनचा काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, उत्तर कोरियाची (North Korea) पहिली ट्रेन चीनहून निघाल्यानंतर दुसरी ट्रेन चीनला रवाना झाली. एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या ट्रेनद्वारे उत्तर कोरियाने चीनकडून आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी मदत सामग्री आणि वस्तू मागवल्या आहेत. तथापि, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यानहापच्या अहवालात म्हटले आहे की, उत्तर कोरियाच्या शिनुइजूमधून दुसरी ट्रेन सोमवारी सकाळी चीनला रवाना झाली. ही मालवाहू गाडी रिकामी असल्याचेही सांगण्यात येत आहे. तथापि, दक्षिण कोरियाच्या (South Korea) अधिकार्‍यांनी काहीतरी गूढ असल्याचे म्हटले आहे.

North Korea
चीनच्या लोकसंख्येत सलग पाचव्या वर्षी मोठी घसरण

तसेच, कोरोना महामारी (Corona Epidemic) सुरु झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमा बर्‍याच काळासाठी सील करण्यात आल्या होत्या. सुमारे दीड वर्षांनंतर उत्तर कोरियाची पहिली ट्रेन यालू नदीवरील पुलावरुन चीनच्या सीमेकडे जाताना दिसत आहे. दक्षिण कोरियासाठी चीनला जाणारी ही ट्रेन सध्या एक गूढच आहे. तेही जेव्हा उत्तर कोरियाने या महिन्यात चौथ्यांदा क्षेपणास्त्र डागले आहेत. याआधी उत्तर कोरियाने रेल्वेगाडीवरुन टॅक्टिकल गाईडेड क्षेपणास्त्र सोडले होते.

शिवाय, उत्तर कोरियाने चीनकडून वैद्यकीय पुरवठा मागवला असून जो मालवाहू ट्रेनच्या सुमारे 15 बोगींमध्ये आहे. ही ट्रेन उत्तर कोरियाहून चीनला अशा वेळी पाठवण्यात आली आहे, जेव्हा चंद्र नववर्ष 1 फेब्रुवारीला आहे. त्याच वेळी, 4 फेब्रुवारीपासून बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक सुरु होत आहे. तर 16 फेब्रुवारीला किम जोंग उनचे वडील किम जोंग इल यांची जयंती देखील आहे. उत्तर कोरियाने केलेली ही सुरुवात तूर्त तरी सुरु राहण्याची अपेक्षा आहे, असेही सूत्रांकडून समोर आले आहे.

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने सांगितले आहे की, येथून रेल्वेने कोणत्या प्रकारच्या वस्तू पाठवल्या जात आहेत यावर लक्ष ठेऊन आहे. हे लोकांच्या हालचाली आणि दोन देशांमधील व्यापारासाठी आहे किंवा त्याचा आणखी काही अर्थ आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते ली जोंग जू यांनी सांगितले की, रेल्वेने किती साहित्य आणले किंवा पाठवले जाते यावरही मंत्रालय लक्ष ठेवून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com