Gun  Dainik Gomantak
ग्लोबल

Canada Shootout: कॅनडा येथील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

सोमवारी मिल्टनमध्ये झालेल्या गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

कॅनडातील ओंटारियो येथे गोळीबारात (Canada Shootout) जखमी झालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. सोमवारी मिल्टनमध्ये झालेल्या गोळीबारात एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला. सतविंदर सिंग असे नाव असलेल्या या विद्यार्थ्याचा शनिवारी हॅमिल्टन शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती हिल्टन टेरिटोरियल पोलिस सर्व्हिसने जारी केलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.

भारतीय विद्यार्थी सतविंदर सिंग एमके ऑटो रिपेअर्समध्ये अर्धवेळ काम करत होता. यावेळी झालेल्या गोळीबारात त्यालाही गोळी लागली. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत टोरंटो पोलीस हवालदार अँड्र्यू हॉग आणि एमके ऑटो रिपेअरचे मालक शकील अश्रफ यांचाही मृत्यू झाला आहे. असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले, असे पोलिसांनी सांगितले. यामध्ये हल्लेखोराचा मृत्यू झाला. 40 वर्षीय शॉन पेट्री असे त्याचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT