'मी RSS मध्ये यायला तयार', KRK ची मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती

KRK
KRK Dainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके आपल्या विविध वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतो. केआरके नुकताच तुरूंगातून बाहेर पडला असून, त्यांने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) सामिल होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्याच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. असं काय झालं की केआरकेला संघात / आरएसएसमध्ये सामिल होण्याची ईच्छा झाली आहे. असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

KRK
Revolutionary Goans : नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती गोमंतकियांना मारक ठरणार

केआरकेने याबाबत एक ट्विट केले आहे. त्यात केआरके सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) टॅग केले असून, आरएसएसला माझी गरज असेल तर, मी आरएसएसमध्ये यायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केआरकेच्या या ट्वीटमुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीटप्रकरणी मध्यंतरी त्याला अटक केली होती.

केआरके नेहमीच चित्रपट समीक्षेच्या नावाखाली बॉलिवूड चित्रपटांवर तोंडसुख घेताना दिसतो. नुकतंच त्याने ‘ब्रह्मास्त्र’विषयी ट्वीट केलं असून, पाठोपाठ आपण ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचं समीक्षण करणार आहोत असंही त्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com