Delivery Boy Spits On Food Order Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: आणखी किती पाहिजेत? 250 रुपये टीप देऊनही नाराज डिलिव्हरी बॉय फूड ऑर्डरवर थुंकला

डिलिव्हरी बॉय ग्राहकाने दिलेल्या टीपवर नाखूष होता आणि त्यामुळे यातून त्याने आपली निराशा काढली. अपार्टमेंटमधील डोअरबेल कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

Ashutosh Masgaunde

A delivery boy in Florida, USA, spat on customer food order after getting low tip:

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाने कमी टीप दिल्याने त्यांच्या फूड ऑर्डरवर थुंकल्याचा गलिच्छ प्रकार समोर आला आहे.

डिलिव्हरी बॉय ग्राहकाने दिलेल्या टीपवर नाखूष होता आणि त्यामुळे यातून त्याने आपली निराशा काढली. अपार्टमेंटमधील डोअरबेल कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसत आहे की, ग्राहकाची ऑर्डर घराच्या दारात ठेवल्यानंतर डिलिव्हरी बॉय पेमेंट मिळण्याची वाट पाहत आहे. ज्यावेळी पेमेंट मिळाले त्यावेळी टीप कमी मिळाल्याचे त्याच्या लक्षात आहे.

टीप कमी मिळाल्याने निराश झाल्याने या डिलिव्हरी बॉय पुन्हा दारापाशी जाऊन फूड ऑर्डवर थुंकू लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकाने डिलिव्हरी पार्टनरला टीप म्हणून 3 USD (अंदाजे 250 रुपये) देऊ केले, तरीही तो निराश होऊन पार्सलवर थुंकला.

ही ऑर्डर एका 13 वर्षांच्या मुलाची आणि त्याच्या आईची होती ज्यांनी त्यांच्या डोरबेल कॅमेऱ्यातून ही घटना पाहीली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलगा म्हणाला, "माझी प्रतिक्रिया अशी होती की मला हे खूप घृणास्पद वाटले." या दोघांनी जेवणासाठी सुमारे ३० USD दिले आणि ज्याने ते घरी पोहोचवले त्याला ३ USD ची टीप दिली होती.

या गलिच्छ प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर डिलिव्हरी कंपनीने या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीवरून काढून टाकले. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा गलिच्छ प्रकार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT