ती मरणाशी झुंजत होती अन् तो हसत होता, विद्यार्थिनीला चिरडणाऱ्या पोलिसाबाबत धक्कादायक खुलासा

नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली जान्हवी 2021 मध्ये बंगळुरूहून सिएटलला पदव्युत्तर पदवी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स करण्यासाठी गेली होती.
Indian student Janhavi Kandula was killed by a police car In Seattle
Indian student Janhavi Kandula was killed by a police car In SeattleDainik Gomantak
Published on
Updated on

Indian student Janhavi Kandula was killed by a police car while crossing the street in the city of Seattle:

या वर्षी जानेवारीमध्ये पोलिसांच्या गस्ती वाहनाने चिरडल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी विनोद करताना दिसला. हा सर्व प्रकार पोलीस अधिकाऱ्याच्या बॉडी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यामुळे सिएटल पोलीस युनियनच्या अधिकाऱ्या विरुद्ध तपास सुरू करण्यात आला आहे.

सोमवारी, सिएटल पोलिस विभागाने अधिकारी डॅनियल ऑडररच्या बॉडी कॅमेऱ्यातील फुटेज जारी केले.

साउथ लेक युनियन भागातील कर्मचाऱ्यांना प्रतिसाद दिल्यानंतर ऑडरर आपला बॉडी कॅमेरा चालू ठेवून पुढे गेला. तेव्हा काही क्षाणातच तिथे आलेला दुसरा अधिकारी केविन डेव्ह चालवत असलेल्या गस्ती वाहनाने भारतीय वंशाची विद्यार्थिनी जाह्नवी कंडुलाला धडक दिली आणि त्यामध्ये ती ठार झाली.

नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली जान्हवी 2021 मध्ये बंगळुरूहून सिएटलला पदव्युत्तर पदवी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स करण्यासाठी गेली होती. जान्हवी या वर्षी डिसेंबरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार होती.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ऑडरर हसण्याआधी "ती मेली आहे" असे म्हणताना ऐकू येते. कंडुलाचा संदर्भ देत ऑडेरर म्हणाला, "नाही, ती एक नियमित व्यक्ती आहे." क्लिपच्या शेवटी, तो हसत हसत, "हो, फक्त एक चेक लिहा. तरीही ती 26 वर्षांची होती," असे पीडितेचे वय चुकीचे सांगताना ऐकू येत आहे.

जानेवारीमध्ये जान्हवीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर त्यांचे मन दु:खी झाले आहे. KJR-FM रेडिओला दिलेल्या मुलाखतीत, कुटुंबाने म्हटले आहे की, "जान्हवीच्या दुःखद आणि अकाली मृत्यूमुळे तिचे कुटुंब तुटले गेले आहे जे कधीही दुरुस्त होणार नाही. ती तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती जी भारतात प्राथमिक शाळेत शिकवते."

जान्हवीच्या आईची कमाई $200 पेक्षा कमी होती, तरीही तिने जान्हवीला अमेरिकेत शिकण्यासाठी पाठवले, या आशेने की जान्हवीचे भविष्य चांगले होईल आणि परदेशात चांगले आयुष्य असेल. पण आता तिच्या आईच्या सर्व आशा आणि स्वप्ने संपली आहेत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com