A cab driver used a trick and earned Rs 23 lakh by canceling rides in US. DAINIK GOMANTAK
ग्लोबल

एक ट्रिक वापरली अन् राइड्स रद्द करून Cab Driver ने कमावले 23 लाख रुपये

कॅब ड्रायव्हर सकाळी १० ते पहाटे २ या वेळेत बार किंवा विमानतळासारख्या गर्दीच्या ठिकाणी कॅब चालवतो. त्याने वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो आठवड्यातून 40 तास काम करायचा.

Ashutosh Masgaunde

A cab driver used a trick and earned Rs 23 lakh by canceling rides in US:

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे एका उबेर ड्रायव्हरने राइड्स रद्द करून एका वर्षात 23 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

यासाठी कॅब चालकाने अनेक राइड्स रद्द केल्या. त्याला मिळालेल्या राइड रिक्वेस्टपैकी 10 टक्के राइड त्याने स्वीकारल्या. असे असूनही, त्याने 2022 मध्ये 23.3 रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅब ड्रायव्हरचे नाव बिल असे असून त्यांचे वय 70 वर्षे आहे. निवृत्तीनंतर, ते एक हौशी कॅब ड्रायव्हर म्हणून काम करतात कारण त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे.

बिल म्हणाले की, त्यांनी येणारी प्रत्येक राइड रिक्वेस्ट स्वीकारली नाही, त्यांनी फक्त त्याच राइड स्वीकारल्या ज्यामुळे त्यांचा वेळ वाचू शकेल. त्यांनी जास्त वेळ घेणाऱ्या राईड घेतल्या नाहीत.

गर्दीच्या वेळी जास्त वेळ काम

बिल यांनी सांगितले की, जेव्हा मागणी वाढायची तेव्हा ते कॅब चालवत असायचे. ते सकाळी १० ते पहाटे २ या वेळेत बार किंवा विमानतळासारख्या गर्दीच्या ठिकाणी कॅब चालवायचे.

त्यांनी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते आठवड्यातून 40 तास काम करायचे. यामध्ये ते फक्त 30 तास कॅब चालवत असे.

बिला यांच्या मते, त्यांनी आपला उर्वरित वेळ ग्राहकांच्या शोधात घालवला. त्यांनी सांगितले की आता तो फक्त 10 ते 15 तास कॅब चालवतात.

वन-वे राइड्स टाळल्या

70 वर्षीय बिल यांनी असेही उघड केले की, ते 'वन-वे राइड्स' टाळतात. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, जेव्हा ते शहरापासून 2 तास दूर एका ग्राहकाला सोडण्यासाठी गेले तेव्हा त्यांना राईडसाठी 27 डॉलर्स मिळाले. मात्र परतीच्या वेळी एकही राईड न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे त्यानंतर बिल यांनी वन-वे राइड्स न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

आताही, बिल जेव्हा त्यांना फायदेशीर वाटेल तेव्हाच कॅब चालवतात.

2022 मध्ये एकूण 1500 राइड स्वीकारल्या

बिल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 2022 मध्ये एकूण 1500 राइड्स केल्या. यातून त्यांनी 28 हजार डॉलर्स कमावले. भारतीय चलनानुसार ही रक्कम २३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

बिल यांनी सांगितले की, ते हे काम पैसे कमावण्यासाठी करत नाहीत तर त्यांना प्रवास करायला आवडतो, म्हणून ते कोणतीही राइड स्वीकारतात. त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका राइडमधून 30-60 डॉलर्स मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

SCROLL FOR NEXT