
Mobile filled with offensive photos and videos after canceling cab ride, shocking incident in Bangalore: बेंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केली म्हणून महिलेला शेकडो नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवले आहेत.
32 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस एका टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेत आहेत. ज्याने महिलेला कॅब राइड रद्द केल्यानंतर शेकडो नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवले.
"माझी मुलगी चालायला तयार नसल्याने मी कॅब बुक केली. बुकिंग केल्यानंतर तीन मिनिटांनी माझे 9 महिन्यांचे दुसरे बाळ रडू लागले. हा प्रकार एका ऑटो चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला घरापर्यंत सोडू का विचारल्याने, मी कॅब राइड रद्द केली ज्यासाठी माझ्याकडून आगाऊ शुल्क आकारले गेले होते," असे पीडित महिलेने सांगितले.
यानंतर कॅब राइड रद्द केल्यानंतर महिलेला त्रास सुरू झाला. दिनेश नाव असणाऱ्या ड्रायव्हरने तिला वारंवार फोन करून कॅब पुन्हा बूक करण्याची मागणी केली. कारण तो आधीच 5 किमी गाडी चालवत आला होता आणि तो तिच्या ठिकाणाजवळच असल्याचा आग्रह धरत होता.
महिलेने त्याची माफी मागितली. "माझे बाळ रडत असल्याने मी त्याला लवकर येण्यास सांगितले होती. मी आणखी दोन मिनिटे थांबले, पण तो लवकर आला, म्हणून मी ऑटोरिक्षा घेतली," असे पीडित महिला पुढे म्हणाली.
कॅब रद्द केल्याननंतर महिलेने ड्रायव्हरला सर्व प्रकाराचे स्पष्टीकरण दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. तरीही, ड्रायव्हर महिलेला सतत कॉल आणि मेसेजेस पाठवतच होता.
यामुळे बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक्स सिटी शेजारील बसापुरा येथील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेने ९ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
महिलेकडे त्याने पाठवलेल्या डाउनलोड केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट होता. "तोपर्यंत मी रडत होते. माझ्या शेजाऱ्यांनी माझा फोन घेतला आणि ड्रायव्हरला खडसावले. माझ्या शेजाऱ्यांनी ड्रायव्हरला इशारा दिल्यानंतर त्याने लगेच मेसेज डिलीट केले आणि कॉल डिस्कनेक्ट केला," असे पीडित महिला पुढे म्हणाली.
महिलेने कॅब राइड रद्द केल्यानंतर ड्रायव्हरला तिचा नंबर कसा अॅक्सेस करता आला, असे विचारले. पोलिसांनी एग्रीगेटरकडून ड्रायव्हरचा तपशील मागवला आहे. लैंगिक छळ आणि आयटी कायद्यानुसार आयपीसी कलम 354 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.