अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी वधारला

कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया झाला मजबूत
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

कच्च्या तेलाच्या किमती नरमल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया आज 12 पैशांनी मजबूत झाला. यामूळे रुपयाची किंमत 77.93 वर पोहोचली आहे. विदेशी निधीची विक्री असली तरी, देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमकुवत कल आणि परदेशातील मजबूत डॉलरमुळे रुपयाचा नफा मर्यादित झाला असल्याचं ही मत तज्ज्ञांनी नोंदवलं. (Rupee Rise 12 paise against us dollar )

मिळालेल्या माहितीनुसार आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 77.98 वर मजबूत झाला आणि नंतर 77.93 पर्यंत वाढला, ही वाढ मागील बंद किंमतीच्या तुलनेत 12 पैशांनी दर्शवित आहे. मागील सत्रात रुपया पाच पैशांनी वधारून 78.05 वर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर निर्देशांक 0.30 टक्क्यांनी घसरून 104.38 वर आला. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.26 टक्क्यांनी घसरून $112.83 प्रति बॅरलवर आला.

काय फायदा काय तोटा ?

भारतीयांनी जास्तीत जास्त डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचे अथवा गडगडल्याचे पाहीले आहे. ही स्थिती देशातील वस्तु आणि माल याच्या निर्यातीसाठी लाभकारक असतो; कारण अशा स्थितीत देशातील वस्तूंची किंमत कमी होते.

देशातील वस्तु इतर देशांच्या तुलनेत कमी किमतीत मिळत असल्याने अर्थात इतर देशाकडून देशांतर्गत वस्तु आणि निर्यातक्षम घटकांना जगभरात चांगली निर्यात होऊ शकणार आहे. याविरुद्ध मात्र कमकुवत रुपया आयातीसाठी हानीकारक असतो ज्या स्थितीला वस्तु या स्वस्त होण्याऐवजी अधिक महाग झाल्याचे पहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com