Israel-Hamas War: इस्रायलने हमासच्या मुख्यालयाला घातला वेढा, IDF ने हमास कमांडरला मारले ठार!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायलचे संरक्षण दल गाझामध्ये बॉम्बहल्ले करत आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायलचे संरक्षण दल गाझामध्ये बॉम्बहल्ले करत आहे. ताज्या घडामोडीत इस्रायली सैन्याने गाझामधील हमासच्या मुख्यालयाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे.

दहशतवाद्यांची अनेक महत्त्वाची ठिकाणे त्यांनी ताब्यात घेतली आहेत. एक महत्त्वाचा लष्करी तळ ताब्यात घेण्यात आला असून तेथून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि गुप्तचर सामग्री ताब्यात घेतली आहे. आयडीएफने 10 दहशतवाद्यांच्या गटाला ठार केले, ज्यामध्ये हमास कमांडर, वेल असेफा याचा समावेश आहे.

इस्रायली संरक्षण दलाने दावा केला आहे की, हमासच्या (Hamas) देर अल-बलाह बटालियनचा कमांडर वेल असेफा याने 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यांचे नेतृत्व केले होते. त्याने सेंट्रल कॅम्प ब्रिगेडच्या इतर कमांडरसह इस्रायलमधील नरसंहारादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांना पाठवण्यात मदत केली होती.

त्यानंतरही त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. 1992-1998 दरम्यान इस्रायलविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्याला तुरुंगावासाची शिक्षा झाली होती.

दुसरीकडे, परस्पर समन्वयाने इस्रायली लष्कर दहशतवाद्यांविरोधात सातत्याने यशस्वी ऑपरेशन करत आहे. जमिनीवर असलेल्या त्यांच्या सैन्याने हमासचा एक सक्रिय अँटी-टँक क्षेपणास्त्र सेल ओळखला आणि IDF जेट्संना माहिती दिली.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: '...तर पुढचा नंबर युरोप असेल', नेतान्याहू यांनी युद्धादरम्यान 80 राजदूतांना दिला इशारा

त्यानंतर आयडीएफच्या लढाऊ विमानांनी हमासचा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र सेल नष्ट केला. त्याचप्रमाणे आयडीएफच्या नौसैनिकांनीही हमासच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले. जमिनीवर असलेल्या सैन्याने अनेक हमास दहशतवाद्यांना शोधून काढले जे अल-कुद्स रुग्णालयाजवळील (Hospital) इमारतीत लपून बसले होते.

आयडीएफच्या आर्टिलरी हल्ल्यामुळे हमासच्या दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. इस्रायली सैन्य हमासची कमांडर्सची घरे आणि तळ उडवून देत आहे. गेल्या 30 दिवसांत हे युद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

इस्रायली लष्कराने गाझाची दोना भागात विभागणी केली आहे. उत्तर गाझाला वेढा घातल्यानंतर इस्रायली लष्कर अल-शिफा रुग्णालयात पोहोचले.

दरम्यान, अल-शिफा रुग्णालयाच्या खाली हमासचे मुख्यालय आहे. एवढेच नाही तर हमासचे बंकरही उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. हमाचे बंकर उद्धवस्त करण्यात 'बंकर बस्टर बॉम्ब'चे सहाय्य घेण्यात आले.

बंकर बस्टर बॉम्ब जो जमिनीच्या 200 फूट खाली असलेली हमासची ठिकाणे उद्ध्वस्त करत आहे. यावेळी गाझामध्ये घुसलेल्या इस्रायली सैनिकांनी हमासचा पर्दाफाश केला आहे. मशिदीजवळ हमासने रॉकेट लॉन्चिंग पॅड बांधल्याचे त्यांनी दाखवले.

Israel-Hamas War
Israel - Hamas War 2023: 48 तासांत इस्रायली सैन्य पोहचणार गाझा सिटीत, धोकादायक ग्राउंड ऑपरेशनच्या भीतीने हमास सैरभैर

लढा स्थानिक नसून जागतिक आहे.

नेतन्याहू म्हणाले की, "ही स्थानिक लढाई नसून जागतिक लढाई आहे. या धुरीला पराभूत करणे ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. आम्ही गाझामध्ये हमासविरुद्ध लढा देत आहोत. आम्ही हमासचा पराभव करु, आम्ही हमासचा नायनाट करु.

ही लढाई आम्ही नक्कीच जिंकू... आम्हाला विश्वास आहे की, सर्व सुसंस्कृत शक्तींनी आम्हाला या युद्धात साथ दिली पाहिजे कारण ही लढाई आपल्या सर्वांची असून विजयही सर्वांचा असेल.''

दुसरीकडे, हमास, हिजबुल्लाह आणि हौथी यांच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इस्रायलच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असूनही इस्रायलचे सैन्य थांबले नाही किंवा झुकले नाही. आव्हान स्वीकारुन आयडीएफचे सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे.

7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली हवाई हमासवरील हल्ल्याची कमान संभाळली. आता जमिनीवरही युद्ध तीव्र झाले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्रीही गाझामध्ये पोहोचले आहेत. तिथे ते आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हमास, हिजबुल्लाह आणि हौथीच्या हल्ल्याने इस्रायलच्या वाढल्या अडचणी, गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन तीव्र

तसेच, या 30 दिवसांत इस्रायलने हमासचे कंबरडे मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. दोन्ही बाजूंनी सुमारे 11 हजार लोकांनी जीव गमावला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. एकट्या गाझामध्ये सुमारे 9500 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये 1000 हून अधिक दहशतवाद्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, तब्बल 20 हमास कमांडरही मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

इस्रायली सैन्याने दहशतवाद्यांचे ऑपरेशनल हेडक्वार्टर, लॉन्चिंग पॅड, प्रशिक्षण शिबिरे आणि शस्त्रास्त्रांची गोदामेही उद्ध्वस्त केली आहेत. आता ज्या ठिकाणी दहशतवादी लपल्याचे पुरावे सापडत आहेत त्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com