Cuban Blast  ainik Gomantak
ग्लोबल

क्युबाची राजधानी हवाना येथे भीषण स्फोट; 22 जण दगावले

द्रवरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाल्याचं स्पष्ट

दैनिक गोमन्तक

हवाना : क्युबाची राजधानी हवाना येथे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये आत्तापर्यंत 22 जण दगावले आहेत. हा स्फोट शुक्रवारी रात्री हवाना येथील एका हॉटेलमध्ये झाला असुन, हॉटेलमधून धुराचे लोळ बाहेर पडू लागल्यावर ही बाब समोर आली आहे. (A bomb blast near the Cuban capital, Havana )

स्फोट झाल्यानंतर तात्काळ सुरक्षकारक्षकांनी तातडीने बचाव दलाचं पथक घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केलं. बचावकार्य तातडीने सुरु केलं असले तरी या स्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या ही 30 पर्यंत गेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट गॅस गळतीने झाला असून घटनेनंतर काही वेळातच क्युबाचे राष्ट्रध्यक्ष मिगुल डियाझ यांनी ही घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. व बचावकार्याचा वेग देण्यासाठीच्या सुचना दिल्या आहेत. तसेच हवानाचे सचिव लुईस अँटोनियो यांनी सांगितलं की, आम्हाला ढिगाऱ्याखाली काही मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अद्याप अडकले असण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने स्पष्ट केलेल्या वृत्तानूसार म्हटलं की- द्रवरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट क्युबासाठी मोठा आर्थिक तोटा ठरू शकतो. कारण कोरोना साथीनंतर आता क्युबातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशात हा स्फोट घडल्यानं पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. तसेच अमेरिकेच्या निर्बंधांमुळे येथील अर्थव्यवस्था आधीच वाईट स्थितीतून जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT