Tiktok App  Dainik Gomantak
ग्लोबल

TikTok Ban: अमेरिकेतही टिकटॉकवर हातोडा, संसदेने मंजूर केले बंदी घालण्याचे विधेयक

Ban On TikTok In USA: दरम्यान, अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, जर काँग्रेसने हे विधेयक मंजूर केले तर ते त्यावर स्वाक्षरी करतील.

Ashutosh Masgaunde

अमेरिकन संसदेत नुकतेच टिकटॉकवर बंदी घालण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. अमेरिकेतील मुलांमध्ये टिकटॉक खूप लोकप्रिय आहे. याचे प्रतिकूल परिणाम मुलांवर होत असल्याने अमेरिकन पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात प्रस्तावित विधेयकाच्या बाजूने 352 मते पडली तर विरोधात फक्त 65 मते पडली. रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट या दोन्ही प्रमुख पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या बाजूने स्वारस्य दाखवले. विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते.

आता हे विधेयक सिनेटकडे जाणार आहे. मात्र, हे विधेयक येथे मंजूर होईल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जर हे विधेयक सिनेटनेही मंजूर केले तर ते अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी व्हाईट हाऊसकडे पाठवले जाईल.

दरम्यान, अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, जर काँग्रेसने हे विधेयक मंजूर केले तर ते त्यावर स्वाक्षरी करतील.

अमेरिकेत सुमारे 17 कोटी यूजर्स TikTok वापरतात. विधेयकानुसार, TikTok ॲप विकण्यासाठी, ByteDance ला चीनसोबतचे संबंध तोडण्यासाठी किंवा अमेरिकेतील ऑपरेशन्स थांबवण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

द प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन ॲडव्हर्सरी कंट्रोल्ड ॲप्लिकेशन्स ऍक्टने कंपनीवर चीनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर या ॲपला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे.

2020 च्या सुरुवातीला या ॲपवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. चिनी सोशल मीडिया ॲप्सचा वापर वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी आणि इतरांची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT