Temple Twitter/ @4biddnKnowledge
ग्लोबल

Temple In Saudi Arabia: सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने प्राचीन मंदिर

Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये 8000 वर्षे जुन्या धार्मिक मंदिराचे अवशेष सापडले आहे.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia news: सौदी अरेबियामध्ये 8000 वर्षे जुन्या धार्मिक मंदिराचे अवशेष सापडले आहे. या ऐतिहासिक मंदिराचे शिलालेख रियाधच्या नैऋत्येला वसलेल्या तटीय शहराच्या उत्खननात सापडले आहेत. सौदी अरेबियातील (Saudi Arabia) पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने अल-फाच्या जागेवर नव्या तंत्रज्ञानाच्या साहय्याने या मंदिराचा शोध लावला आहे. या संशोधनात सापडलेले अवशेष अभ्यासासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या शोधात उच्च दर्जाची हवाई छायाचित्रण, ड्रोन फुटेज, रिमोट सेन्सिंग, लेझर सेन्सिंग आणि इतर अनेक सर्वेक्षणांचा वापर करण्यात आला आहे.

मंदिराचा शोध

'सौदी गॅझेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अल-फा चा परिसर गेल्या 40 वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. सर्वेक्षण स्थळावरील शोधांपैकी एक शोध हा या मंदिराचा (Temple) होता. यावरुन असे दिसून येते की, त्या काळी इथे काही लोक राहत होते, ज्यांच्या जीवनात पूजा आणि यज्ञ या विधींना खूप महत्त्व होते. या मंदिराचे नाव तुवैक पर्वताच्या नावावरुन ठेवण्यात आले होते. जे आता 'अल-फव' म्हणून ओळखले जाते. आत्तापर्यंतच्या निकालानुसार, अल-फा येथील लोक अतिशय धार्मिक होते. उत्खननात एक शिलालेख सापडला आहे. जो अल-फा कहल या देवतेच्या अस्तित्वाची पुष्टी करतो.

दुसरीकडे, या जागेवर एका प्राचीन मोठ्या शहराचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषामध्ये काही मनोऱ्यांचे अवशेषही आहेत. या संशोधनादरम्यान, या प्रदेशात कालवे, जलस्रोत आणि जगातील सर्वात कोरड्या भूमीतील शेकडो खड्डे आणि सिंचन प्रणालीचा शोध यामध्ये लागला आहे. येथील पूर्वीच्या संशोधनाच्या अहवालानुसार या भागात हजारो वर्षांपूर्वीपासून मंदिर आणि मूर्तीपूजेची संस्कृती (Culture) होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT