Thailand 
ग्लोबल

Thailand: थायलंडमध्ये मोठ्या जुगार रॅकेटचा पर्दाफाश, 80 भारतीयांना अटक

थायलंड पोलिसांनी जुगाराच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 93 जणांना अटक केली, त्यापैकी 80 भारतीय आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

थायलंड पोलिसांनी जुगाराच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 93 जणांना अटक केली, त्यापैकी 80 भारतीय आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मध्यरात्री 1.15 च्या सुमारास छापा टाकला.

27 एप्रिल ते 1 मे या कालावधीत हॉटेलच्या खोल्या बुक केल्या होत्या आणि सॅम्पाओ नावाची खोली जुगार खेळण्यासाठी भाड्याने देण्यात आली होती. संपाव येथे मोठ्या प्रमाणावर लोक जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी 93 जणांना ताब्यात घेतले. यापैकी 83 भारतीय, सहा थायलंडचे तर चार म्यानमारचे नागरिक आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 93 पैकी 80 भारतीय होते तर इतर क्रीडा संघटक आणि कर्मचारी होते. पोलिसांनी चार बॅकरेट टेबल, तीन ब्लॅकजॅक टेबल, कार्डचे 25 संच, 209,215,000 चिप्स, 160,000 भारतीय रुपये, आठ क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे, 92 मोबाईल फोन, तीन नोटबुक संगणक, एक आयपॅड आणि तीन कार्ड डीलर मशीन जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या 80 भारतीयांमध्ये हाय प्रोफाईल कॅसिनो आयोजक चिकोटी प्रवीणचाही समावेश आहे. यापूर्वी ईडीने त्याच्यावर तेलंगणामध्येही गुन्हा दाखल केला होता.

निवास आणि जुगाराच्या ठिकाणाचे प्रभारी, 32 वर्षीय सित्रानन कॅव्हलोर यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. सर्व भारतीयांना 50,000 बाट शुल्क आकारले जाते. जुगार खेळण्यासाठी 10 लाख 20 हजार भाड्याने दिले होते. दुपारी एक वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत खोली उघडी राहिली आणि यादरम्यान हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत प्रवेश दिला गेला नाही. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Tweet Viral: जर्सी नंबरचं कनेक्शन! शुभमन गिलकडे नेतृत्व येताच रोहितचं '13 वर्षांपूर्वीचं' ट्विट चर्चेत, म्हणाला होता...

Goa Crime: धक्कादायक! सात वर्षीय मुलीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 47 वर्षीय आरोपीला अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Illegal Beef Trafficking: बेळगावहून गोव्यात बेकायदेशीर गोमांस वाहतूक, केरी चेकपोस्टवर 400 किलो मांस जप्त; 27 वर्षीय 'सोहील' पोलिसांच्या ताब्यात

Gulega worship in Tulu Nadu: ..वराह रूपं दैव वरिष्ठं! इतिहास तुळुनाडुतील ’कोला’ उत्सवाचा

Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

SCROLL FOR NEXT