prevented by infection control claims lancet study Dainik Gomantak
ग्लोबल

स्वच्छता आणि हात धुण्याच्या सवयीमुळे दरवर्षी वाचू शकतो 7.5 लाख लोकांचा जीव; द लॅन्सेटचा दावा

Lancet Study: कोरोना महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले होते.

Manish Jadhav

Lancet Study: कोरोना महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले होते. जगभरात स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये सेलिब्रिटींनीही भाग घेतला होता. अधिक भर देण्यात आलेल्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे हात नियमितपणे स्वच्छ करणे. जर तुम्ही कोरोना काळात सुरु केलेल्या त्या सवयी विसरला असाल तर लॅन्सेट जर्नलचे संशोधन वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या दिनक्रमात पुन्हा या उपायांचा समावेश कराल. हात धुण्याच्या सवयीमुळे लाखो जीव वाचू शकतात, असे लॅन्सेटचे म्हणणे आहे.

द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, संसर्ग प्रतिबंधक उपायांमध्ये सुधारणा करुन कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रतिवर्षी प्रतिजैविक प्रतिकारशक्तीशी संबंधित सुमारे 7.5 लाख मृत्यू टाळता येऊ शकतात. संशोधकांनी सांगितले की, या उपायांमध्ये हातांची नियमित स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे. याशिवाय, प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देऊन आणि लहान मुलांसाठी नवीन लसींची उपलब्धता वाढवून अनेक मृत्यू टाळता येऊ शकतात.

द लॅन्सेटच्या लेखकांचे म्हणणे आहे की, संशोधकांचा असा अंदाज आहे की दरवर्षी जागतिक स्तरावर दर आठपैकी एक मृत्यू जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. एकूण 77 लाख मृत्यू. त्यापैकी 50 लाख जीवाणूंशी संबंधित आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात एंटीबायोटिकच्या अयोग्य वापरामुळे एंटीमाइक्रोबियल रेजिस्टेंसचा धोका वाढत गेला. हा थेट मॉडर्न मेडिसिनवर हल्ला होता. संसर्गास प्रतिबंध करण्यामुळे दरवर्षी 3.37 लाख मृत्यू टाळता येऊ शकतात. लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिल्यास आणि स्वच्छता राखल्यास वर्षाला सुमारे अडीच लाख मृत्यू टाळता येतील.

एएमआरचा भारताला काय धोका आहे?

दरम्यान, याकडे लक्ष न दिल्यास 2050 पर्यंत दरवर्षी सुमारे 1 कोटी लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागेल, असा संशोधकाचा अंदाज आहे. एंटीबायोटिकच्या अयोग्य वापरामुळे दरवर्षी किमान सात लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतही (India) धोक्याच्या झोनमधून बाहेर नाही. अंदाजानुसार, यामुळे एकूण मृत्यूंपैकी 90 टक्के मृत्यू आशिया आणि आफ्रिकेत होतील. याचा परिणाम विकसनशील देशांवरही होईल, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल

जागतिक बँकेच्या (World Bank) म्हणण्यानुसार, या आजारावर उपचार घेण्यासाठी एखाद्याला हॉस्पिटलमध्ये अनेक फेऱ्या माराव्या लागतील. त्यामुळे लोकांना उपचारावरही जास्त खर्च करावा लागेल. यामुळे 2030 पर्यंत 2.4 कोटी लोक गरिबीत जाऊ शकतात. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. UN आरोग्य एजन्सीने मानवतेला आव्हान देणाऱ्या 10 सार्वजनिक आरोग्य धोक्यांच्या यादीत AMR चा समावेश केला आहे. लॅन्सेट अभ्यासातही संशोधकांनी याकडे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT