

Orry spotted in Goa: बॉलीवूड पार्ट्यांमध्ये सतत दिसणारा आणि सोशल मीडियामुळे चर्चेत आलेला चेहरा, इंटरनेट व्यक्तिमत्व 'ऑरी' (Orhan Awatramani) याने नुकताच गोव्याचा दौरा केला. त्याने आपल्या या प्रवासाचा अनुभव दाखवणारी एक खास 'रील' सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे. गोव्यातील निवांत आणि अस्सल अनुभव खूपच आकर्षक असल्याचं मत ऑरीने व्यक्त केलं.
गोव्यातील पर्यटन देश-विदेशातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते, आणि 'ऑरी'देखील याला अपवाद नव्हता. त्याने गोव्यात घालवलेल्या दिवसाचा तपशील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.
ऑरीने सकाळी उठून, गोव्याचा प्रसिद्ध पाव म्हणजेच 'पोळी' (Poi) खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर पणजीतील प्रसिद्ध, रंगीबेरंगी आणि पोर्तुगीज आर्किटेक्चरसाठी ओळखल्या जाणाऱ्या फॉन्तेनाझ (Fontainhas) या वसाहतीला भेट दिली.
दुपारी त्याने पोटभर गोवन फूडचा आनंद घेतला. यानंतर मासे पकडण्याचा अनुभव घेत तो रात्री निवांत झोपून गेला.
ऑरीच्या या पोस्टमुळे गोव्यातील पारंपरिक पर्यटन आणि स्थानिक अनुभवांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली आहे. 'ऑरी' स्टाईलचा हा दिवस अत्यंत आकर्षक असल्याचं त्याने म्हटल्याने, गोव्यातील 'स्लो ट्रॅव्हल' ट्रेंडला बळ मिळालं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.