6 killed, 7 injured in Yemen bomb blast Dainik Gomantak
ग्लोबल

येमेनमध्ये बॉम्बस्फोट 6 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला आहे(Yemen bomb blast)

दैनिक गोमन्तक

येमेनच्या (Yemen) अदन (Aden blast) शहरात रविवारी झालेल्या कार बॉम्ब (Yemen Bomb Blast) हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला आहे(Yemen bomb blast), मात्र हे दोन्ही अधिकारी सुरक्षित आहेत . सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात कृषी मंत्री सालेम अल-सोकोत्राय आणि ताहे जिल्ह्यातील एडनचे गव्हर्नर अहमद लम्लास यांना लक्ष्य करण्यात आले होते. (6 killed, 7 injured in Yemen bomb blast)

येमेनमध्ये स्फोटात लामालाच्या साथीदारांसह किमान सहा जण ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर घटनास्थळाजवळून जाणारे किमान सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मयिन अब्दुल मलिक साई यांनी या स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, हा दहशतवादी हल्ला असल्याचे वर्णन केले आहे. आतापर्यंत कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेची काही छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात हा स्फोट किती जीवघेणा होता हे लक्षात येत आहे.

तर दुसरीकडे येमेनचे मंत्री मोअम्मर अल-इरयानी यांचे म्हणणे आहे की, या हल्ल्यात सहा जण ठार झाले, तर सात जण जखमी झाले. स्थानिक सरकारी सूत्राने सांगितले की, हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये राज्यपालांचे प्रेस सचिव आणि त्यांचे छायाचित्रकार, त्यांच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख आणि एक साथीदार तसेच एक नागरिक यांचा समावेश आहे.अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. लामालास हे दक्षिणी संक्रमण परिषदेचे (एसटीसी), एक अलगाववादी गट सरचिटणीस आहेत. त्यांनी एडन आणि येमेनच्या दक्षिण भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौदी समर्थित सरकारशी लढा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT