Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand Mass Shooting: संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आतापर्यंतचे 5 मोठे शूटआउट

Thailand Nursery Shooting: थायलंडमधील चाइल्ड डे केअरमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने सुमारे 35 लोकांना ठार मारले.

दैनिक गोमन्तक

Thailand Mass Shooting: थायलंडमधील चाइल्ड डे केअरमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने सुमारे 35 लोकांना ठार मारले. या हल्ल्यानंतर संपूर्ण जग भयभीत झाले. हल्लेखोराने गोळीबारानंतर पत्नी आणि मुलाचीही हत्या केली. विशेष म्हणजे, त्याने स्वत:ही आत्महत्या केली. मात्र अशा गोळीबाराची ही भीषण घटना काही पहिली नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 5 घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी संपूर्ण जग हादरले होते.

दरम्यान, सप्टेंबर 2004 मध्ये, उत्तर ओसेशियाच्या बेसलान शहरातील एका शाळेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. दहशतवाद्यांनी तीन दिवस शाळेला वेढा घातला होता. या दहशतवादी हल्ल्यात 330 हून अधिक लोक मारले गेले, ज्यात बहुतेक मुले होती. रशियाचे (Russia) लोक दुखावले जावेत म्हणून दहशतवाद्यांनी (Terrorists) जाणूनबुजून मुलांना लक्ष्य केले होते.

तसेच, 3 एप्रिल 2015 रोजी, अल-कायदा (Al-Qaeda)-संबंधित इस्लामिक दहशतवादी गट अल-शबाबने केनियाच्या (Kenya) गारिसा महाविद्यालयावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी कॉलेजवर बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात 147 जणांचा मृत्यू झाला, तर 79 जण जखमी झाले होते. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नंतर तपासात असे दिसून आले की, दहशतवादी ख्रिश्चनांना लक्ष्य करत होते आणि मुस्लिमांना तेथून जाऊ देत होते.

दुसरीकडे, 16 डिसेंबर 2014 रोजी पाकिस्तानातील (Pakistan) पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवादी ग्रेनेड आणि अत्याधुनिक रायफल घेऊन शाळेत आले होते. या दहशतवादी हल्ल्यात एकूण 150 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 134 विद्यार्थी होते.

शिवाय, 6 जुलै 2013 रोजी, काही दहशतवाद्यांनी नायजेरियातील योबे राज्याच्या मामुडो गावात एका सरकारी शाळेवर हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 42 जणांचा मृत्यू झाला, त्यात बहुतांश मुले होती. तर, 24 मे 2022 रोजी अमेरिकेतील टेक्सासमधील एका शाळेत गोळीबार झाला होता. या गोळीबारात 19 मुले आणि इतर 3 जणांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी रायफल घेऊन उवालदे येथील राब एलीमेंट्री स्कूलमध्ये घुसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT