America Firing: अमेरिकेतील इंडियानामध्ये बेशुट गोळीबार, हल्लेखोरासह 4 ठार

अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये गोळीबार झाला असून, त्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना रोजच समोर येत आहेत. इंडियानामध्ये सोमवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली असून, त्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ही घटना ग्रीनवूड पार्क मॉलमधील असुन जिथे रायफलसह सशस्त्र बंदूकधारी फूड कोर्टमध्ये घुसला आणि गोळीबार सुरू केला. (america firing indiscriminate firing indiana 4 accused killed News)

घटनेच्या वेळी काही लोकांनी आरोपीकडून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची हत्या करण्यात आली आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

* जुलैच्या पहिल्या आठवड्यातही गोळीबार झाला होता

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही इंडियानामध्ये गोळीबाराची घटना पाहायला मिळाली होती. इंडियानामधील गॅरी सिटीमध्ये एका पार्टीदरम्यान गोळीबार झाला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार हॉलिडे पार्टी दरम्यान झाला. त्याचवेळी, गेल्या महिन्यात म्हणजेच जूनमध्येही गोळीबाराची घटना समोर आली होती, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता.

* अमेरिकेत गोळीबाराचा सिलसिला थांबत नाही आहे

अमेरिकेत गेल्या काही काळापासून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. टेक्सासपासून शिकागोपर्यंत आणि अमेरिकेतील इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये निर्दोष वृत्तीने घटना घडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Iran Displays Donald Trump In Jail Billboard Tehran
Champi Cyclone
Bhavika Mangalanandan
France Protests 2026 Causes
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com