Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Poverty: अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची निम्मी लोकसंख्या गरीब, 16 टक्के जनतेची अवस्था दयनीय

world bank pakistan poverty report: जागतिक बँकेकडून जागतिक गरिबी निर्देशांक अपडेट करण्यात आला आहे आणि त्यात पाकिस्तानच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

भारताला अनेकदा अणुयुद्धाची धमकी देणारा पाकिस्तान गरिबीविरुद्धची लढाई हरताना दिसत आहे. पाकिस्तानची जवळपास निम्मी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. पाकिस्तानची ४५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. ही माहिती जागतिक बँकेच्या आकडेवारीत देण्यात आली आहे. २०२२-२३ च्या सर्वेक्षणानुसार जागतिक बँकेने ही माहिती दिली आहे.

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या कमी करत पाकिस्तानला अपयश येत असल्याचे मत बँकेने व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत अत्यंत गरिबीत जगणाऱ्या पाकिस्तानी लोकांची संख्या ४.९ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

जागतिक बँकेकडून जागतिक गरिबी निर्देशांक अपडेट करण्यात आला आहे आणि त्यात पाकिस्तानच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कोणतीही वाढ झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय गरिबी रेषा ३ डॉलर्सच्या मासिक उत्पन्नावर आधारित आहे. पाकिस्तानमध्ये ४५ टक्के लोक असे आहेत ज्यांचे उत्पन्न महिन्याला तीन डॉलर्स देखील नाही, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

पूर्वी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्देशांकाचा मानक २.१५ डॉलर होता, तो आता ३ डॉलर पर्यंत वाढला आहे. पूर्वी जागतिक बँकेने कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी म्हणजेच एलआयसीसाठी दरडोई उत्पन्न दर डॉलर २.१५ निश्चित केला होता. तेव्हा पाकिस्तानमधील ४.९ टक्के लोक गरीब मानले जात होते. आता हे मानक ३ डॉलर प्रतिदिन झाले आहे. यासह हा आकडा आता १६.५ वर पोहोचला आहे.

गरिबी व्यतिरिक्त, पाकिस्तान आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीतही मागे आहे. गेल्या दीड वर्षात पाकिस्तानमध्ये पोलिओचे ८१ रुग्ण आढळले आहेत. जगातील अनेक देश पोलिओमुक्त झाले असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अजूनही आढळणारे पोलिओचे रुग्ण चिंताजनक बाब असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: 'अलविदा...' रोहित शर्माची पोस्ट व्हायरल! 'मुंबईचा राजा' घेणार निवृत्ती? चाहते चिंतेत

Goa Agriculture Damage: मोरजीत परतीच्या पावसाचा हाहाकार, भात शेती पाण्याखाली

Government Jobs: गोवा सरकारची मेगा भरती! आरोग्य खात्यात 59, तर समग्र शिक्षा अभियानात 66 कंत्राटी पदांसाठी 'सुर्वणसंधी'

7 मिनिटांत 850 कोटींचा दरोडा, नेपोलियन बोनापार्टच्या बायकोचे दागिने केले लंपास; जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम चोरीप्रकरणी दोघे अटकेत!

Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

SCROLL FOR NEXT