Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोठा घोटाळा, बड्या युक्रेनियन अधिकाऱ्यांनी शस्त्र खरेदीच्या नावाखाली...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला पुढच्या महिन्यात (फेब्रुवारी) तीन वर्षे पूर्ण होतील.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला पुढच्या महिन्यात (फेब्रुवारी) तीन वर्षे पूर्ण होतील. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले हे युद्ध एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही. कारण एकीकडे रशिया उघडपणे एकटा उभा आहे, तर दुसरीकडे 27 युरोपीय देश आणि अमेरिकेच्या मदतीने युक्रेन या युद्धात यशस्वीपणे टिकून आहे. युक्रेनने आतापर्यंत अनेक राज्यांना रशियन सैन्यांच्या जंजाळातून मुक्त केले आहे. दोन्ही देशांमधील वर्चस्वाच्या या युद्धात युक्रेनचे नुकसान तर झालेच पण रशियाने देखील संपत्ती, प्रसिद्धी आणि 90 टक्के सैनिकांना गमावले. या भीषण युद्धादरम्यान युक्रेनमध्ये एक मोठा लष्करी घोटाळा समोर आला आहे. संरक्षण मंत्रालय आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्र खरेदीच्या नावाखाली 33 अब्ज रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.

युक्रेनच्या SBU सुरक्षा सेवेने शनिवारी सांगितले की, देशाच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांनी शस्त्रास्त्र खरेदीच्या नावाखाली सुमारे $40 दशलक्ष (सुमारे 33 अब्ज रुपये) डॉलरचा भ्रष्टाचार केला. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने देखील पुष्टी केली आहे की, रशियाबरोबर सुरु असलेल्या दोन वर्षांच्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये मोठा लष्करी घोटाळा झाला. या भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यानंतर देशात हा मोठा मुद्दा बनला आहे.

SBU ने म्हटले की, ''तपासादरम्यान संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि शस्त्रास्त्र पुरवठादार ल्विव्ह आर्सेनलच्या व्यवस्थापकाचा पर्दाफाश झाला आहे, ज्यांनी शेल खरेदी करताना सुमारे 1.5 अब्ज रिव्निया (युक्रेनियन चलन) हडपले." तपासानुसार, या घोटाळ्यात संरक्षण मंत्रालयाचे माजी आणि सध्याचे उच्चपदस्थ अधिकारी आणि संलग्न कंपन्यांचे प्रमुख यांचा समावेश आहे. यात युक्रेनियन सैन्यासाठी 100,000 मोर्टार शेल्स खरेदी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

2 वर्षांपूर्वी दिलेले पैसे, अद्याप शस्त्रे मिळाली नाहीत

एसबीयूने सांगितले की, ऑगस्ट 2022 पर्यंत ल्विव्ह आर्सेनलसोबत मोर्टार शेल्ससाठी करार करण्यात आला होता. युद्ध सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा मोठा लष्करी घोटाळा समोर आला आहे. काही निधी परदेशात हस्तांतरित करण्यात आला. मात्र एवढा कालावधी लोटूनही लष्कराला शस्त्रे देण्यात आलेली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. खात्यांमधून हस्तांतरित केलेली रक्कम इतर परदेशी बँक खात्यांमध्येही ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

पाच जणांना नोटीस, एकाला अटक

निवेदनात म्हटले आहे की, पाच जणांना "संशयास्पद नोटिसा" बजावण्यात आल्या आहेत. यात संरक्षण मंत्रालय आणि शस्त्रास्त्र पुरवठादार या दोघांशी संबंधित उच्च अधिकारी आहेत. युक्रेनची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे.

दुसरीकडे, युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे. युक्रेनमधील लष्करातील भ्रष्टाचार हा विशेषतः संवेदनशील मुद्दा आहे कारण तो युद्धाच्या काळात घडला, जेव्हा युक्रेन त्याच्या वर्चस्वासाठी लढत आहे. 27 युरोपीय देशांकडे युक्रेन सातत्याने मदतीची याचना करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी पाश्चात्य मित्र राष्ट्रांशी चर्चेत युक्रेनचे प्रतिनिधित्व करुनही भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये काढून टाकण्यात आले होते. जरी त्यांच्यावर वैयक्तिकरित्या भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप नसला तरी, त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे होती. या भ्रष्टाचारामध्ये सैनिकांना पुरेसा अन्न पुरवठा न करणे आणि सैनिकांना योग्य कपडे न देणे इत्यादी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT