Saudi Arabia  Dainik Gomantak
ग्लोबल

सौदी अरेबियात 25 भारतीयांसह 35 जण ओलीस

दैनिक गोमन्तक

सौदी अरेबियातील यंबू शहरात 25 भारतीय नागरिकांसह 35 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात सौदी अरेबियाच्या अलजहरानी कंपनीने सर्व लोकांचे व्हिसा नूतनीकरण न केल्याने हे घडल्याचा आरोप केला जात आहे. नूतनीकरण न झाल्यामूळे सौदी अरेबियामध्ये राहण्याचा वैध दस्तऐवज कालबाह्य झाला आहे. ज्याचा परिणाम 35 जणांना सौदी अरेबियाचे अवैध नागरिक बनवले आहेत. ओलीस ठेवलेल्यांमध्ये राजस्थानचा रहिवासी असलेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याच ही स्पष्ट झालं आहे. (35 hostages in Saudi Arabia, including 25 Indians )

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील रहिवासी आहे. ओलीस ठेवल्यानंतर सोहनलालची तब्येत बिघडली आहे. परंतु, अनेक दिवसांपासून त्याला उपचार मिळाले नाहीत. परिस्थिती बरीच बिघडल्यानंतर आता सोहनलाल यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, रुग्णालयात योग्य उपचार आणि औषधेही उपलब्ध नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.

बुंदीचे रहिवासी चर्मेश शर्मा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयात तक्रार केली आहे. व भारतीय नागरिकाचा जीव वाचवावा अशी मागणी केली आहे. यात भारतीय नागरिकांसह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील बंधक असलेल्या इतर दहा नागरिकांना मानवतावादी आधारावर मदत देण्याची मागणी केली आहे.

सौदी अरेबियामध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये राजस्थान, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. ओलीस ठेवलेल्यांना कंपनीने बाहेर काहीही न सांगण्याची धमकी दिली आहे. त्यामूळे भारत सरकार यावर आपली भुमिका काय घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT