Firing in Thailand Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand Firing: थायलंडमध्ये पाळणाघरात बेछूट गोळीबार; 24 बालकांसह 36 ठार

माजी पोलिस अधिकाऱ्याचे कृत्य; पत्नीसह मुलाला मारून स्वतःही केली आत्महत्या

गोमन्तक डिजिटल टीम

Thailand Firing: थायलंडच्या ईशान्येकडील भागातील एका पाळणाघरात एका बंदूकधारी माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 24 बालकांसह इतरांचा समावेश आहे. जवळपास 10 जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती, पोलिस दलातील उपप्रवक्ता आर्खन क्रेयताँग यांनी दिली. नॉंग बुआ लाम्फू या प्रांतातील ना क्लांग जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधाधुंद गोळीबार करणारी बंदुकधारी व्यक्ती ही माजी पोलिस अधिकारी आहे. पान्या कामराब असे त्याचे नाव असून तो 34 वर्षांचा आहे. त्याला काही काळापुर्वीच निलंबित करण्यात आले होते. गोळीबारानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने पत्नीला आणि मुलालाही ठार मारल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून स्थानिक रुग्णालयांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

या घटनेनंतर पंतप्रधानांनी सर्व तपास यंत्रणांना गुन्हेगांरांना पकडून कारवाईचे आदेश दिले आहेत. थायलंडमध्ये इतर देशांच्या तुलनेत अवैधरित्या बंदूक खरेदी करण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही. बऱ्याच अवैध बंदुका सध्या शेजारील वाद सुरू असलेल्या राष्ट्रांच्या सीमेवरून थायलंडमध्ये आलेल्या आहेत.

दरम्यान, अमेरिकेत मास शुटिंगचे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. तसेच अमेरिकेच्या शेजारील मेक्सिकोमध्येही असे प्रकार कधीकधी घडत असतात. तथापि, थायलंडमध्ये मास शूटिंगचे (Mass Shooting) प्रकार वारंवार घडलेले नाहीत, तथापि, २०२० मध्ये एका संतप्त जवानाने मालमत्तेचा करार फिस्कटल्याने केलेल्या गोळीबारात २९ जणांचा मृत्यू झाला होता तर ५७ जण जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT