Pakistan File Photo Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Hostage Crisis: पाकिस्तानात 40 तासांच्या ओलिस नाट्यात तब्बल 33 दहशतवाद्यांचा खात्मा

तालिबानने 16 मौलवींचेही ऐकले नाही

Akshay Nirmale

Pakistan Hostage Crisis: पाकिस्तानातील बन्नू जिल्ह्यातील काऊंटर टेररिझम सेंटर (CTD) ताब्यात घेणाऱ्या तहरीक-ए-तालिबानच्या (TTP) 33 दहशतवाद्यांना पाक लष्कराने ठार केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत ही माहिती दिली. या कारवाईत दोन कमांडोही मारले गेले आहेत. टीटीपी दहशतवाद्यांनी एका मेजरसह चार जवानांना ओलीस ठेवले होते. पाकिस्तानने 16 मौलवींची एक टीम अफगाणिस्तानला चर्चेसाठी पाठवली होती. तथापि, हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करत असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराने लष्करी कारवाई केली. या कारवाईचे संपूर्ण श्रेय लष्कराला देताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले की, खैबर पख्तूनख्वाचे सरकार दहशतवाद रोखण्यात पूर्णपणे पराभूत झाले आहे.

या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात जायचे होते. सुरक्षादलांनी संपूर्ण छावणीला चारही बाजूंनी घेरले. लष्कर आणि स्थानिक प्रशासन वाटाघाटीद्वारे ओलिसांची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवर सुमारे 6 महिन्यांपासून प्रचंड तणाव आहे. यापूर्वी तालिबानच्या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार या दोन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ होते.

विशेष बाब म्हणजे महिलांना हिजाबमध्ये कैद ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या तालिबान सरकारचे अधिकारी हिनाचे स्वागत करण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचले तेव्हा ती तिच्या जुन्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये होती. हिजाब घालणे तर दूरच, तिने डोक्यावर स्कार्फही बांधला नव्हता. पाकिस्तानातील काही मौलवींनी हिनाला अफगाणिस्तानात पाठवण्यास विरोध केला होता.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात ड्युरंड लाइन ही सीमारेषा आहे. पण तालिबानने ही लाईन मान्य केलेली नाही, ते पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा राज्याला अफगाणिस्तानचा भाग मानतात. पाकिस्तानी सैन्याने अफगाण सीमेवर काटेरी तारा लावल्या आहेत. ते काटेरी तारांचे कुंपण तालिबानने उखडून टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

SCROLL FOR NEXT