Germany Bank Heist X - Social Media
ग्लोबल

जर्मनीत बँकेची भिंत फोडून चोरी केले 290 कोटी रुपये; ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केला होता मास्टर प्लॅन

Germany bank heist: चोरीचा खुलासा २९ डिसेंबरच्या सकाळी झाला, जेव्हा बँकेचा फायर अलार्म वाजला.

गोमंतक ऑनलाईन टीम

बर्लिन: जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरात असलेल्या स्पार्कस बँकेत २९० कोटी रुपयांची चोरी झाली. चोरांनी बँकेच्या पार्किंग गॅरेजच्या भिंतीला मोठे भगदाड पाडले आणि थेट तिजोरीपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी ३,२५० हून अधिक सेफ डिपॉझिट लॉकर तोडले आणि त्यातील रोकड व मौल्यवान दागिने घेऊन पळ काढला.

पोलिसांनुसार, चोरांनी ही चोरी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये केली, जेव्हा बहुतेक दुकाने आणि कार्यालये बंद होती. असे मानले जात आहे की, गुन्हेगारांनी हा काळ जाणूनबुजून निवडला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि परिसरात लोकांची वर्दळही कमी असावी.

चोरीचा खुलासा २९ डिसेंबरच्या सकाळी झाला, जेव्हा बँकेचा फायर अलार्म वाजला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि बँक अधिकाऱ्यांनी पाहिले की, पार्किंगमधून बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचण्यासाठी भिंतीला मोठे भगदाड पाडले होते. या कामासाठी मोठ्या ड्रिल मशीनचा वापर करण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, बँकेच्या आसपास राहणाऱ्या काही लोकांनी शनिवार रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत अनेक मुखवटा घातलेल्या लोकांना मोठ्या पिशव्या घेऊन जाताना पाहिले होते. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये काळ्या रंगाची ऑडी कारही दिसली आहे, ज्यात चोर बसले होते.

पोलिसांनी या संपूर्ण चोरीची तुलना हॉलिवूड चित्रपट 'ओशन इलेव्हन'शी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इतकी मोठी आणि नियोजनाने केलेली चोरी अनेक दिवसांच्या तयारीशिवाय शक्य नव्हती. दुसरीकडे, स्पार्कस बँकेने म्हटले आहे की, बँक आपल्या ग्राहकांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बस-ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; 11 जणांचा मृत्यू, 33 प्रवासी गंभीर जखमी VIDEO

Goa Electoral Roll: मतदार यादीतून 6 जणांची नावे वगळणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

Horoscope: धनत्रयोदशीला लक्ष्मी-कुबेराची विशेष कृपा! 'या' राशींचे नशीब चमकणार; धनलाभासह नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Chimbel Krishna Temple: देवळी पाडली तर 4 मूर्तींचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 'तीर्थकोटी कॉरिडॉर'चा विचार!

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

SCROLL FOR NEXT