चुकीला माफी नाही! पडताळणीनंतर दोषी आढळणारे 'क्लब' कायमचे बंद करणार; CM प्रमोद सावंतांचा इशारा

Pramod Sawant club warning: उच्चस्तरीय बैठकीनंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Goa News On Nightclub
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेची सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या प्रकरणी दोषी ठरलेल्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, दोषींची गय करणार नसल्याचे सांगून 'चुकीला माफी नाही', असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरीत सचिवालयात माध्यमांशी बोलताना दिला.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक सहाय्यक अधिकारी चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ पर्यावरणीय अभियांत्रिकी विजय कानसेकर यांनी चुकीचे निरीक्षण अहवाल दिल्याबद्दल निलंबनाची कारवाई केली असून काही अन्य अधिकारी येत्या काळात या प्रकरणात निलंबित होणार आहेत, त्यासंबंधीची कारवाईही सरकारने सुरू केली आहे.

Goa News On Nightclub
Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

उच्चस्तरीय बैठकीनंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अग्निशमन, अन्न आणि औषध संचालनालय, अबकारी तसेच इतर संबंधीत खात्यातील ज्या अधिकांऱ्यांनी परवानग्या दिल्या आहेत, त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस जारी करण्यात येणार आहे.

कागदपत्रे बनावट !

बर्च बाय रोमियो लेन या क्लबच्या मालकांनी अनेक बनावट कागदपत्रेही बनवली असल्याच्या बाबीकडे उच्चस्तरीय समितीने लक्ष वेधले आहे. या क्लबची आरोग्य परवाना, पोलिस पडताळणी आदी कागदपत्रे बनावट आहेत. केवळ सरपंच आणि सचिवांकडून परवानगी घेतली असून अनेक कागदपत्रे बनावट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले,

Goa News On Nightclub
Vijay Hazare Trophy: अर्जुन तेंडुलकरला धु धु धुतलं! मुंबईच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीचा घेतला समाचार; सर्फराज-यशस्वीची धमाकेदार फलंदाजी VIDEO

'ते' क्लब कायमचे बंद करणार !

ज्या क्लबची कागदपत्रे योग्य नाहीत, ज्यांना परवाने नाहीत, असे क्लब बंद करण्यात आले होते. परंतु ती आता उघडण्यात आली आहेत, कारण त्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीनंतर दोषी आढळणारे क्लब हे कायमचे बंद करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com