2300 year old temple of Buddhist period found in Pakistan

 

Dainik Gomantak

ग्लोबल

पाकिस्तान मध्ये 2300 वर्ष जुने बौद्ध काळातील मंदिर सापडले

या मंदिराचे वर्णन पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर म्हणून केले जाते.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात पाकिस्तानी (Pakistan) आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने 2,300 वर्षे जुने बौद्ध मंदिर (Temple) शोधून काढले आहे. यासोबतच इतर काही मौल्यवान कलाकृतीही उत्खननात सापडल्या आहेत. हे मंदिर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बरीकोट तहसीलमधील बाजीरा शहरात बौद्ध काळातील सापडले आहे. या मंदिराचे वर्णन पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर म्हणून केले जाते.

या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'पाकिस्तान आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वायव्य पाकिस्तानमधील एका ऐतिहासिक ठिकाणी संयुक्त उत्खननादरम्यान 2,300 वर्षे जुने बौद्ध काळातील मंदिर शोधून काढले आहे. याशिवाय इतर मौल्यवान कलाकृतीही जप्त करण्यात आल्या आहेत. स्वातमध्ये सापडलेले हे मंदिर पाकिस्तानातील तक्षशिला येथील मंदिरांपेक्षा जुने आहे.

2700 हून अधिक कलाकृती जप्त केल्या

मंदिराव्यतिरिक्त, पुरातत्वशास्त्रज्ञांनी ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळापासूनची नाणी, अंगठ्या, भांडी आणि खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह इतर 2,700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील जप्त केल्या आहेत. स्वात जिल्ह्यातील बाजीरा या ऐतिहासिक शहरात उत्खननादरम्यान आणखी पुरातत्वीय स्थळे सापडतील, असा विश्वास इटालियन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानमधील इटालियन राजदूत आंद्रे फेरारिस यांनी पत्रकारांना सांगितले की, जगातील विविध धर्मांसाठी पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळे अतिशय महत्त्वाची आहेत.

2020 च्या सुरुवातीला, पाकिस्तानमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात विष्णू मंदिर परिसराचे अवशेष सापडले होते. हा शोध स्वात परिसरातच लागला होता. या अवशेषांवरून असे दिसून आले की येथे किमान 1000 वर्षे जुने हिंदू मंदिर होते. हे मंदिर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी देखील शोधले होते. बरीकोट घुंडईच्या डोंगरांमध्ये उत्खननाच्या वेळी हे मंदिर सापडले. त्यावेळी खैबर पख्तुनख्वाच्या पुरातत्व विभागाचे फजले खालिक यांनी हे मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगितले होते. हिंदू राजेशाही काळात मंदिर बांधले गेले असा दावा केला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT