21 year old US women gang raped in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

US Girl Gang Rape: अमेरिकेतील 21 वर्षीय पर्यटक महिलेवर पाकिस्तानमध्ये सामूहिक बलात्कार

परदेशी महिला व्लॉग बनविण्यासाठी मागील सात महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये होती.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेतील 21 वर्षीय पर्यटक महिलेवर पाकिस्तानमध्ये सामूहिक बलात्कार (21-year-old American woman was allegedly gang-raped in Pakistan) केल्याची धक्कादाक बातमी समोर आली आहे. पर्यटक महिला मागील सात महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये होती. डीजी खान जिल्ह्यातील फोर्ट मुनरो या हॉटेलमध्ये 17 जुलै रोजी ही घटना घडली.

व्लॉगर, टिकटॉकर (Vogger, Tiktoker) असणारी पीडित पर्यटक महिला आपल्या इतर मित्रांसोबत एका व्लॉगसाठी पाकिस्तानला गेली होती. महिलेची सोशल मिडियावर मुसमल सिप्रा याच्याशी मैत्री झाली. सिप्रा याने महिलेला भेटण्यासाठी फोर्ट मुनरो (Fort Monroe) या हॉटेलवरती बोलवले. आणि तिथेच ही घटना घडली, यापूर्वी देखील ती सिप्राला भेटली होती. अशी माहिती आहे.

वृत्तसंस्था पीटीआयला (PTI) दाखल घटनेची एफआयआर मिळाली आहे. यामध्ये महिला पाकिस्तानी मित्र मुसमल सिप्रा आणि अझान खोसा यांच्या सोबत हॉटेलवरती थांबली होती. संधीचा गैरफायदा घेऊन दोघांनी तिच्यावर गँगरेप केला. तसेच, त्या घटनेचा व्हिडिओ देखील तयार करून ब्लॅकमेल केले. असे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पीडित महिलेची वैद्यकिय चाचणी करून दोषी आरोपींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शहबाज (Punjab CM Hamza Shebaz) यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT