ग्लोबल

China Taiwan Tension: 20 चिनी विमाने अन् ड्रोनची तैवानच्या सीमेत घुसखोरी, ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय?

China Taiwan Tension: चीन आपल्या विस्तारवादी धोरणांद्वारे तैवानवर डोळा ठेवून आहे. तैवानने यापूर्वीही चिनी लढाऊ विमाने आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा केला होता.

Manish Jadhav

China Taiwan Tension: चीन आपल्या विस्तारवादी धोरणांद्वारे तैवानवर डोळा ठेवून आहे. तैवानने यापूर्वीही चिनी लढाऊ विमाने आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा केला होता.

आता पुन्हा एकदा तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी सांगितले की, गेल्या 24 तासांत 20 चिनी हवाई दलाची विमाने त्यांच्या सीमा भागात दाखल झाली आहेत. तैवानचा दावा आहे की, विमानांशिवाय फायटर ड्रोनचाही समावेश आहे.

दरम्यान, लोकशाही शासित तैवान हा आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. तैवान तीन वर्षांपासून बीजिंगकडून वाढत्या लष्करी दबावाचा सामना करत आहे.

तैवानच्या (Taiwan) संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारच्या चिनी हालचालींबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, चीनच्या या एक्टिविटीमध्ये सहभागी असलेल्या विमानांमध्ये Su-30 आणि J-10 लढाऊ विमाने आणि पाणबुडीविरोधी विमानांचा समावेश आहे.

तैवानच्या मंत्रालयाने दिलेल्या नकाशानुसार, काही लढाऊ विमाने आणि ड्रोन तैवान सामुद्रधुनीच्या मध्यवर्ती रेषा ओलांडून गेले, चिनी विमाने नियमितपणे तैवानच्या हद्दीत घुसत आहेत. नकाशात TB-001 ड्रोन तैवानच्या उत्तरेकडे उड्डाण करणारे आणि प्रशांत महासागराच्या दिशेने निघालेले दाखवले आहेत.

चीन का संतापला?

वास्तविक, चीनच्या (China) संतापाचे कारण म्हणजे तैवानचे उपराष्ट्रपती विलियम लाई यांचा अमेरिका दौरा. पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकीत तैवानचे पुढील राष्ट्रपती होण्यासाठी विलियम लाई या प्रबळ दावेदार असून त्यांच्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी चीनवर जोरदार टीका केली.

विलियम लाई यांची अमेरिका भेट आणि त्यांच्या भाषणामुळे चीन इतका संतप्त झाला आहे की, तैवानला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच दिली. तैवानच्या सीमेवर जमीन, आकाश आणि समुद्रात चीन सातत्याने युद्धाभ्यास करत आहे.

तैवान उत्तर देण्याची तयारी करत आहे

दुसरीकडे, तैवान (Taiwan) चीनच्या चिथावणीला बळी न पडता आपल्या मिशनवर काम करत आहे. जे मिशन चीनसाठी मोठा धोका आहे.

खरे तर, तैवान असे शस्त्र तयार करत आहे जे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकते आणि गरज पडल्यास प्राणघातक हल्लेही करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT