China Taiwan Tension: चीन आपल्या विस्तारवादी नितीअतर्गंत शेजारील देशांची भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन सातत्याने तैवानवर आपला हक्क सांगत आहे.
चीनच्या सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवानने आपल्या लष्करी बजेटवर विशेष लक्ष दिले आहे. तैवान 2024 साठी आपल्या लष्करी खर्चात 3.5% ने वाढ करेल, असे अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सांगितले.
चीनच्या वाढत्या धोक्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे हे आमचे प्रथम ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. चीन तैवानवर आपला हक्क सांगतो. गेल्या तीन वर्षांत चीनने तैवानवर आपला लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे.
दरम्यान, तैवानने (Taiwan) एकूण प्रस्तावित संरक्षण बजेट ठेवले आहे, ज्याला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता असेल. चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान T$606.8 अब्ज ($19 अब्ज) एवढे तैवानचे प्रस्तावित बजेट आहे.
हे सलग सातवे वर्ष आहे की, तैवानने लष्करी खर्चात वाढ केली आहे परंतु याउलट तैवानचा विकास दर 14% वाढीपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे.
अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी सांगितले की, बजेटमध्ये अतिरिक्त खर्चासाठी "विशेष बजेट" समाविष्ट असेल. "तैवानने आपली स्व-संरक्षण क्षमता बळकट करणे, स्वतःचे रक्षण करण्याचा दृढनिश्चय, राष्ट्रीय सुरक्षा आणि हित सुनिश्चित करणे आणि अधिक आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवणे सुरु ठेवावे," असंही त्या पुढे म्हणाल्या.
राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी तैवानला चीनचा (China) सामना करण्यास सक्षम बनवण्यासाठी लष्करी आधुनिकीकरणावर जोर दिला आहे.
तैवानने F-16 लढाऊ विमानांच्या ताफ्यात सुधारणा केली असून स्वतःची पाणबुडी देखील विकसित करत आहे. तैवानच्या पहिल्या प्रोटोटाइप स्वदेशी पाणबुडीचे पुढील महिन्यात अनावरण होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.