Zara Rutherford Twitter
ग्लोबल

19 वर्षीय महिला पायलटने छोट्या विमानातून घेतला World Tourचा आनंद

दैनिक गोमन्तक

ब्रिटिश आणि बेल्जियन वंशाची (Belgian-British Pilot) सर्वात यंग झारा रदरफोर्डने (Zara Rutherford) इतिहास रचला आहे. 19 वर्षीय झारा आपल्या छोट्या विमानातून संपूर्ण जग व्यापणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे. गुरुवारी जेव्हा झारा तिच्या मायक्रो लाईट विमानातून बेल्जियममधील कोर्टिजक विमानतळावर उतरली तेव्हा तिने 5 महिन्यांत 5 खंडांचा प्रवास पूर्ण केला. या विक्रमी प्रवासादरम्यान झाराने 52 देशांत 51 हजार किमी अंतर कापले.

जाराने गेल्या 18 ऑगस्ट रोजी जगातील सर्वात वेगवान मायक्रो लाईट विमानाने प्रवास करण्यास सुरवात केली होती. झारा बेल्जियममध्ये आल्यावर तिथे उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. 'हा एक वेडा प्रवास होता.'न्यूयॉर्क आणि त्यानंतर आइसलँडमधील सक्रिय ज्वालामुखीची भेट सर्वात संस्मरणीय होती. यादरम्यान आपला मृत्यू होईल अशी भीतीही वाटत होती. सायबेरियाच्या गोठलेल्या भागातून आणि उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून जातानाही मला भीती वाटत होती. उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांची चाचणी करत होता आणि त्यांनी कोणताही पुर्वसुचनाही दिली नव्हती, असे झाराने माध्यमांना सांगितले.

हा विक्रम पूर्ण करण्यासाठी झाराला जगाच्या दोन पूर्णपणे विरुद्ध भागांना स्पर्श करावा लागला. याअंतर्गत ती इंडोनेशियातील जाम्बी आणि कोलंबियातील तुमको येथे उतरली. झाराने या फ्लाइटद्वारे अफगाणिस्तानात जन्मलेल्या अमेरिकन नागरिक शाइस्ता वैसचा विक्रम मोडला आहे. शाईस्ताने 2017 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी एकट्याने प्रवास करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

गाण्यांचाही घेतला आस्वाद

या प्रवासात झाराने मनापासून गाणी ऐकली आणि संपूर्ण प्रवासाचा आनंद लुटला. तिला बेल्जियमच्या आधी जर्मनीत उतरायचे होते, जिथे भरपूर पाऊस आणि बर्फामुळे उतरणे कठीण होते. मात्र, बेल्जियमच्या हवाई दलाच्या एरोबॅटिक्स टीमने तिला मदत केली आणि तिचा हा प्रवासही पूर्ण झाला.

वयाच्या 14 व्या वर्षापासून पायलटचे प्रशिक्षण घेतले

झारा वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासून पायलटचे प्रशिक्षण घेत आहे. तिला 2020 मध्ये पायलटचा परवाना मिळाला. तिचे एक अंतराळवीर बनण्याचे स्वप्न आहे. तिच्या या विक्रमामुळे इतर महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि हवाई क्षेत्रात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT