Pakistan Bus Fire  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bus Fire: कराचीत बसला लागलेल्या आगीत 18 पुरग्रस्तांचा होरपळून मृत्यू; 8 बालकांचाही समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

Pakistan Bus Fire: पाकिस्तानातील कराची येथे एका बसला आग लागून या बसमधील १८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी पुरग्रस्त होते. या पुरग्रस्तांना घेऊन ही बस कराचीहून खैरपूर नाथन शाह भागात जात होती.

कराची बंदरला हैदराबाद आणि सिंध प्रांतातील जमशोरो शहराला जोडणाऱ्या सुपरहायवेवर नुरियाबादजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. पुरग्रस्त लोक या बसमधून दादू जिल्ह्यातील आपापल्या घरी जात होते. दादू हा जिल्ह्या सिंध प्रांतातील सर्वाधित पुरबाधित जिल्ह्यांपैकी एक आहे. हे सर्व मुगैरी समुदायाचे लोक आहेत.

संसदीय आरोग्य सचिव सिराज कासिम सूमरो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. बसच्या मागील बाजूस आग लागली आणि बघताबघता ती वेगाने संपुर्ण बसमध्ये पसरली. एसीमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. काहींनी जीव वाचविण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिंध प्रांतांचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी जमशोरोच्या उपायुक्तांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मृतांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईही दिली जाणार आहे. सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT