17 people killed in firing by Taliban in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणीस्तानात तालिबानचा गोळीबार 17 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबानआणि सशस्त्र लोकांच्या गटात झालेल्या चकमकीत 17 जण ठार झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) हेरात प्रांतात तालिबान (Taliban) आणि सशस्त्र लोकांच्या गटात झालेल्या चकमकीत 17 जण ठार झाले आहेत. पश्चिम अफगाणिस्तानच्या हेरात (Herat) प्रांतात तालिबानी सैनिक आणि सशस्त्र लोकांच्या गटामध्ये झालेल्या संघर्षात 17 जण ठार झाले, अशी बातमी स्पुतनिक या वृत्तसंस्थेने सोमवारी एका स्थानिक रुग्णालयाच्या हवाल्याने दिली आहे.हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये सात मुले लहान , तीन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे . या 17 जणांचे मृतदेह आज हेरात प्रांतातील रुग्णालयात नेण्यात आले आहेत , अशी माहिती सूत्रांनी दिलीआहे . या सर्वांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. (17 people killed in firing by Taliban in Afghanistan aap92)

अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या मते, तालिबान्यांनी रविवारी हेरातमध्ये अपहरणात सहभागी असलेल्या स्थानिक गुन्हेगारांच्या विरोधात विशेष कारवाई केली आहे ज्यात किमान तीन गुन्हेगार ठार झाले आहेत .अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर १५ ऑगस्ट रोजी ताबा मिळवून तालिबानची सत्ता आली. ज्यामुळे मागील सरकार पडले आणि मोठ्या संख्येने परदेशी कामगार आणि अफगाण सहयोगी देश सोडून जाऊ लागले आहेत.

रविवारी झालेली ही चकमक सुमारे तीन तास चालली. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते कारी सईद खोस्ती यांनी आरोप केला की, एका घरात लपलेल्या तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ठार केले आहे . मात्र, प्रांत तालिबानच्या प्रवक्त्याने याबाबत वेगळी माहिती दिली आहे . सुरुवातीला, काही स्थानिक माध्यमांनी असे वृत्त दिले की तालिबान सैन्याने अलीकडेच इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील झालेल्या एका गटावर छापा टाकला होता. 2015 मध्ये अफगाणिस्तानमध्ये आयएसच्या उदयानंतर दोन्ही अतिरेकी गट एकमेकांशी लढत आहेत.

तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये ISIS-K च्या हल्ल्यां दरम्यान, तालिबानचेदेखील अत्याचार थांबत नाहीत. तालिबान बळजबरीने येथील हजारो लोकांना त्यांच्या घरातूनच नाही तर अफगाणिस्तानातूनच बाहेर काढत आहे. मानवी हक्कांवर नजर ठेवणाऱ्या ह्युमन राइट्स वॉचने ही माहिती दिली आहे. या आवाहलात तालिबान प्रामुख्याने शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करत असल्याचे सांगण्यात आले आहे . यासह, पूर्वीच्या अफगाणिस्तान सरकारशी संबंधित लोकांनाही आपले घर सोडण्यास भाग पाडले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

SCROLL FOR NEXT