150 पेक्षा जास्त भारतीय (More than 150 Indians) नागरिकांचे काबुल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी अपहरण (Kidnapped by Taliban)  केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
150 पेक्षा जास्त भारतीय (More than 150 Indians) नागरिकांचे काबुल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी अपहरण (Kidnapped by Taliban) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  Dainik Gomantak
ग्लोबल

काबुल विमानतळावरुन 150 भारतीयांचे अपहरण? तालिबान्यांनी दिले यावर स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तेथे आता अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. यातच आता भारतासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. 150 पेक्षा जास्त भारतीय (More than 150 Indians) नागरिकांचे काबुल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी अपहरण (Kidnapped by Taliban) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काबुल विमानतळावर 220 भारतीय मदतीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मिळाली होती. (220Indians still waiting for help at Kabul airport) त्यातील 85 नागरिकांना घेऊन भारताच्या C-13 J विमानाने उड्डाण केले आहे.

दरम्यान, तालिबानने आम्ही 150 भारतीयांचे अपहरण केले नसून त्यांना विमानतळामध्ये सुरक्षित रित्या नेले आहे. असा दावा त्यांनी केला आहे. परंतु त्यांना कुठे ठेवले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

परंतु अफगाणिस्तानकडून भारतासाठी खूप वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जाते. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. अल-इत्तेहा यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की अपहरणकर्ते तालिबानशी संबंधित होते आणि त्यांनी आठ मिनीव्हॅनमध्ये लोकांना नेले आहे.

काबुल विमानातळावर 220 भारतीय नागरीक असून, मोठ्या गर्दीमुळे त्यांना विमानतळावर येणे देखील अवघड जात आहे. गर्दीमुळे ते विमानतळाबाहेरच आडकले होते. C-13 J ग्लोबमास्टर भारतीयांच्या प्रतिक्षेत आहे. विमानतळावर लोकांनी गर्दी केल्याने भारतीयांना आत जाणे देखील अवघड झाले आहे. काबुल विमानतळाबाहेर गेल्या 6 तासांपासून आडकले आहेत.

अफगाणिस्तान मधील भारतीयांसाठी भारतीय हवाईदलाचे C-13 J विमान काबुलमध्ये दाखल झाले आहे. मात्र तेथील अनेक नागरिक विमानतळाबाहेरच असल्याने काबुल विमानतळावरुन विमानाचे उड्डण आता रखडले आहे. काबुल विमानतळाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये निवडणुकीसाठी वातावरण योग्य नाही, आमची प्राथमिकता सरकार स्थापन करण्याची असेल असे तालिबानने नमूद केले आहे. आम्ही सर्वसमावेशी सरकार बनवू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काबुल भारतीय हवाई दलाचे सी -130 जे परिवहन विमान 85 हून अधिक भारतीयांसह काबूलहून उड्डाण केले. विमान इंधन भरण्यासाठी कझाकिस्तानमध्ये उतरले. भारतीय सरकारी अधिकारी काबूलमधील जमिनीवर भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Goa Today's Live News: बाणावली जिल्हा पंचायतीचीसाठीची पोट निवडणूक जाहीर!

Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

Pali News : खांडेपारच्या शांतादुर्गेची महती अवर्णनीय; देवस्थानच्या पुस्तकांचे प्रकाशन

Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

SCROLL FOR NEXT