अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानचा (Taliban) ताबा मिळाल्यानंतर आता दहशतवाद्यांनी (terrorist attack at Kabul airport) रक्तरंजित खेळ सुरू केला आहे. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर इस्लामिक स्टेट (ISIS ) या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 72 जण ठार झाले (Kabul Airport Blast).त्याचबरोबर सलग तीन बॉम्बस्फोटांमध्ये 11 मरीन कमांडो आणि एक डॉक्टर यांच्यासह 12 अमेरिकन सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. या हल्ल्यात महिला, सुरक्षा कर्मचारी आणि तालिबान रक्षकांसह 143 लोक जखमी झाले आहेत. (12 US soldiers,72 people died in Kabul Airport Blast)
ISIS ने जबाबदारी स्वीकारली
आयएसने काल रात्री उशिरा आपल्या टेलिग्राम खात्यावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की या हल्ल्यात आयएसचा हस्तक होता. एका अमेरिकन अधिकाऱ्याने आपली ओळख गुप्त ठेवताना सांगितले की, या हल्ल्यात किमान 72 लोक मारले गेले. यापैकी 60 अफगाण नागरिक आणि 12 अमेरिकन सैनिक आहेत.
जो बायडन यांचा इशारा
भारतीय वेळेनुसार, रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास, अमेरिकन अध्यक्षांनी माध्यमांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि सांगितले की हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. खबरदारी म्हणून, आता काबूल विमानतळाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.जो बायडन म्हणाले, "या हल्ल्यातील गुन्हेगार तसेच ज्याला अमेरिकेचे नुकसान करायचे आहे, त्यांना माहित आहे की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. आम्ही तुम्हाला विसरणार नाही. आम्ही तुम्हाला ठार मारू, तुम्हाला याचा परतावा द्यावाच लागेल. आम्ही आमचे आणि लोकांचे हित जपू. "
दरम्यान आयएसआयएस खोरासनच्या दहशतवाद्यांनी दावा केला आहे की त्यांनी अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केले आहे. काबूलमध्ये अमेरिका मोठ्या प्रमाणावर बचावकार्य करत आहे. विमानतळाबाहेर हजारो लोक जमले आहेत आणि या गर्दीचा फायदा घेत इसिस खोरासनच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला.
तालिबानने हात झटकले
तालिबान आणि पाकिस्ताननेही स्फोटात लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, या स्फोटानंतर दोषांचा खेळही सुरू झाला आहे. रेडिओ पाकिस्तानशी बोलताना तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी विमानतळावर स्फोट झाल्याचा दावा केला आहे, ज्याचे संरक्षण अमेरिकी सैन्य करत आहे असे सांगत त्याने अमेरिकेला लक्ष केले आहे.
पुन्हा हल्ला होण्याची शक्यता
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दावा केला आहे की आयएस ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा कार बॉम्बने हल्ला करू शकते, ज्याचा धोका खूप जास्त आहे. दहशतवादी आमच्या विमानांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही अमेरिकी सैन्याकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे इटलीने अधिक भितीदायक दावा केला आहे. काबुल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर इटालियन लष्करी विमानावरही गोळीबार करण्यात आल्याचा इटालियन संरक्षण सूत्रांचा दावा आहे.
भारताने केला तीव्र निषेध
काबुलमध्ये झालेल्या या स्फोटांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. त्याच्या प्रतिसादात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की आम्ही काबूलमधील बॉम्बस्फोटांचा निषेध करतो. या दहशतवादी घटनेत ठार झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, या हल्ल्यानंतर संपूर्ण जग दहशतवादाविरोधात आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणाऱ्यां विरोधात एकत्र येणे गरजेचे झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.