Pakistan Stampede Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Stampede: पाकिस्तानमध्ये रेशन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानात सर्वसामान्य जनता आता उपासमारीने मरण्याच्या मार्गावर आहे. रेशनसाठी लोक इकडे तिकडे फिरत आहेत.

Manish Jadhav

Pakistan Karachi Stampede: पाकिस्तानात सर्वसामान्य जनता आता उपासमारीने मरण्याच्या मार्गावर आहे. रेशनसाठी लोक इकडे तिकडे फिरत आहेत.

पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी मोफत रेशनच्या वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह 11 लोक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले.

रेशन वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोक बेहोश झाल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूजने म्हटले आहे.

वृत्तानुसार, ही घटना कराचीच्या SITE (सिंध इंडस्ट्रियल ट्रेडिंग इस्टेट) भागात घडली. कराचीतील सरकारी वितरण केंद्रात अनेक लोकांची गर्दी झाल्यामुळे मृत्यू आणि जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, पाकिस्तान सरकारने (Government) मोफत रेशन वितरण मोहीम सुरु केली होती.

दरम्यान, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या आठवड्यात अशाच चेंगराचेंगरीत चार वृद्ध लोकांचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसानंतर ही घडली आहे.

आजच्या घटनेशिवाय, पाकिस्तानच्या (Pakistan) इतर प्रांतांमध्ये अलिकडच्या आठवड्यात 11 लोक ठार झाले आहेत आणि बरेच जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितले आहे की, वितरण केंद्रांमधून हजारो पोती पिठाचीही लूट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

SCROLL FOR NEXT