Nepal Soldiers In Russian Army. Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: युक्रेनविरुद्ध रशियाकडून लढणारे 100 नेपाळी बेपत्ता, परराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्यामुळे खळबळ

Nepal Soldiers In Russian Army: परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, रशियन लष्कराच्या वतीने लढलेले बहुतेक नेपाळी नागरिक एकतर मरण पावले आहेत किंवा ते युक्रेनमध्ये युद्धकैदी आहेत.

Ashutosh Masgaunde

100 Nepalis missing from Russia fighting against Ukraine, foreign minister's claim sparks furore:

नेपाळचे परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांनी खळबळजनक खुलासा करताना दोनशेहून अधिक नेपाळी नागरिक रशियन सैन्यात भरती झाल्याची आणि त्यातील शंभरहून अधिक बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे.

परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, रशियन लष्कराच्या वतीने लढलेले बहुतेक नेपाळी नागरिक एकतर मरण पावले आहेत किंवा ते युक्रेनमध्ये युद्धकैदी आहेत.

काही दिवसांपूर्वी, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून रशियाच्या बाजूने लढणाऱ्या सात नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि चार जणांना युक्रेनमध्ये युद्धकैदी म्हणून ठेवल्याची माहिती दिली होती.

परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर अशी शेकडो कुटुंबे पुढे आली आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य रशियन सैन्यात सामील झाल्याची लेखी माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री एनपी सौद म्हणाले की, अशा लोकांची संख्या 250 पेक्षा जास्त आहे.

रशियन सैन्यात भरती झाल्याची माहिती देणार्‍या १०० हून अधिक कुटुंबांनी, त्यांचे नातेवाईक एकतर युद्धात मारले गेले आहेत किंवा युक्रेनच्या तुरुंगात युद्धकैदी असल्याची माहिती समोर आली आहे, असे परराष्ट्र मंत्री सौद यांनी उघड केलं आहे.

सुरुवातीपासून नेपाळ सरकारने रशियन सैन्यात सामील होण्यावर किंवा कोणत्याही देशाच्या वतीने लढण्यावर बंदी घातली आहे, तरीही एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक रशियन सैन्यात सामील होत आहेत आणि रशियाकडून त्यांना सोडण्यात येत आहे.

सुमारे 200 ते 300 नेपाळी नागरिक रशियन सैन्यात सामील झाल्याबद्दलची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे, परंतु रशियन सरकारने अधिकृतपणे फक्त काही डझन नेपाळी नागरिक रशियन सैन्यात सामील झाल्याची माहिती दिली आहे आणि त्यापैकी फक्त सात जण ठार झाल्याचे सांगितले आहे, असे परराष्ट्र मंत्री सौद म्हणाले.

रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या नेपाळी नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि रेडक्रॉस यांच्यामार्फत समन्वय साधला जात आहे.

मंत्री सौद यांनी असेही सांगितले की, मॉस्कोमधील नेपाळी दूतावास देखील रशियन प्रशासनाशी समन्वय साधत आहे आणि तेथील नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न करत आहे.

आणखी काही नागरिकही तेथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावरील पाळत वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच परराष्ट्र मंत्रालय युक्रेन सरकारच्या संपर्कात आहे आणि युक्रेनमधील नेपाळचे राजदूत युक्रेनमध्ये बंदिवान असलेल्या लोकांना सोडवण्यासाठी त्यांच्याशी बोलत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM सावंतांच्या हस्ते Ironman 70.3 चा शुभारंभ! तेजस्वी सूर्या, अन्नामलाई, सैयामी खेर यांच्यासह 31 देशांतील 1300 ॲथलीट्सची उपस्थिती

Kidney Disease: चिंताजनक! किडनी विकारात भारत जगात दुसऱ्या स्थानी, 13.8 कोटी लोक प्रभावित; लॅन्सेटच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची 6 भाकितं ठरली खरी, भविष्यातील धोक्यांकडे जगाचे वेधले लक्ष; 2026 वर्षाबाबत सतावू लागली चिंता

Amanda Wellington: "मला भारताकडून क्रिकेट खेळायचंय..." दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडूचं विधान चर्चेत VIDEO

Women Heart Attack: थकवा, श्वास घेण्यास त्रास? सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे हृदयविकाराची पूर्वसूचना, वेळीच उपचार घ्या

SCROLL FOR NEXT