Ganesh Chaturthi : कोरोनापासून रक्षणासाठी फोंडा निरंकाल येथील वानरमारे समाजाने बाप्पाला नवस केला होता. तो पूर्ण करण्यासाठी यावर्षी समाजाने 11 दिवस गणपती पुजण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीदिवशी विधीवत पूजन करत वानरमारे समाजाने बाप्पाची मूर्ती स्थापन केली आहे. याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे, समाजातील एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याने बाप्पाचा नवस फेडण्यासाठी समाज एकत्र आला आहे.
निरंकाल फोंडा परिसरात झोपडीमध्ये राहणारे वानरमारे समाजाचे लोक आपल्या क्षमतेनुसार दरवर्षी दीड, पाच दिवसांसाठी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. कोरोना संकटामुळे सगळ्या समाजाकडून दीड दिवसांचा गणपती पुजण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचवेळी 2020 साली आपल्या समाजावर कोरोनाचं सावट येऊ नये यासाठी बाप्पाकडे साकडंही बोलण्यात आलं होतं. कोरोना संकटामध्ये समाजातील अजूनही एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण न झाल्याने यंदा हा 11 दिवस गणपती पुजण्याचा नवस फेडला जात आहे.
या परिसरात 25-30 झोपड्यांमध्ये हे वानरमारे वास्तव्य करतात. या सर्वांनी गणेशाची स्थापना करण्यासाठी वर्गणी गोळा केली आहे. दिवसभर ठिकठिकाणी काम करुन मिळालेल्या पैशातून काही पैशांची बचत समाजाकडून करण्यात आली आहे. याच वाचवलेल्या पैशांमधून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. वानरमारे समाज अशिक्षित असल्यामुळे त्यांना आरती वाचता येत नाही त्यामुळे मोबाईलवर आरती लावून बाप्पाची पूजा केली जाते आणि प्रसाद वाटला जातो. बाप्पाने आपल्याला कोरोनापासून वाचवलं अशी या समाजाची श्रद्धा आहे. याच श्रद्धेच्या माध्यमातून यथाशक्ती मनोभावे पूजा 11 दिवस केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.