Goa Ganesh Festival Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Goa Ganesh Festival: गोव्यात गणेशोत्सवाच्या सजावटीच्या कामांना वेग

Goa Ganesh Festival: युवकांसह बच्चे कंपनीही दिवस-रात्र जागून या कामांमध्ये रंगली आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थी चार दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील मंडळे, तसेच ग्रामीण भागात घरोघरी साफसफाई, रंगरंगोटी तसेच सजावटीच्या कामांना वेग आला आहे. घरातील ज्येष्ठ, युवकांसह बच्चे कंपनीही दिवस-रात्र जागून या कामांमध्ये रंगली आहेत.

घरातील महिलांचा सुद्धा कामाचा व्याप वाढला असून त्यांना थोडीही उसंत मिळत नाही. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. युवक कलात्मकता प्रदर्शित करण्यासाठी या सणाची आतुरतेने वाट बघतात. अनेक ठिकाणी चलतचित्रे, हलते-स्थिर देखावे उभारले जातात. त्यात पताकांची सजावट हे एक प्रमुख आकर्षण ठरते.

कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा सजावटीच्या कामात मुले मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत. कापलेले रंगीत कागद (फोली) सुटे करणे, त्यांना चिकटवण्यासाठी फेव्हिकाॅल किंवा घरात तयार केलेली चिकी लावण्यास मदत करणे, अशा कामांत ती गुंग आहेत. इतरांपेक्षा आपला देखावा व सजावट सुंदर आणि वेगळा असावा, असा प्रत्येकाचा हेतू असतो. काही गावांमध्ये देखावा, तसेच सजावटीच्या स्पर्धाही घेण्यात येतात.

खालचा वाडा-साळ येथील दर्शन परब आणि कुटुंबीय यंदा आकर्षक द्रोणांचा वापर करून सुंदर सजावट करण्यात गुंतले आहेत. प्रत्येक घरात सजावटीसाठी रात्री जागवल्या जात आहेत. गृहिणी नेवऱ्या, चिवडा, शंकरपाळी, चकली यासारखे खाद्यपदार्थ तयार करण्यात गुंतल्या असून गावागावांत आनंदमय माहोल दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

SCROLL FOR NEXT