Jit Arolkar: मातीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देणार

चिकण मातीचा करत वापर पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य
clay Ganpati artists
clay Ganpati artistsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: चिकण माती पासून मूर्ती तयार करणाऱ्या गणपती मूर्तीकारांना सरकारकडून योग्य त्या योजना मिळवून देण्याची ग्वाही मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली. मांद्रे मतदार संघातील जे पारंपारिक चिकण माती पासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात अशा कलाकारांना हस्तकला महामंडळामार्फत चिकण माती तयार करून देणारे यंत्र वितरित केले, यावेळी ते आज दि. 26 रोजी मांद्रे येथे बोलत होते.

(MLA Jit Arolkar will encourage clay Ganpati artists)

चिकण मातीचाच वापर करावा

आमदार जित आरोलकर यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले की, निसर्गाची सेवा करण्यासाठी आणि निसर्गाची, भूमातेची पूजा करायची असेल तर प्रत्येक गणेश भक्ताने केवळ चिकण मातीचा वापर करून तयार केलेल्या मूर्तींचे पूजन करावे. असे आवाहन त्यांनी केले. याबरोबर पर्यावरणाचे रक्षण करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या नजरेतून प्रत्येकाने काम करावे असे ते म्हणाले.

clay Ganpati artists
Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या, गोव्यातील गणेश स्थापनेसाठी तारीख, वेळ, कथा आणि शुभ मुहूर्त

मूर्तिकार आणि चिकण मातीचा वापर करून मोठ्या प्रमाणात मूर्ती कराव्यात, प्लास्टर ऑफ पॅरिसला पूर्णविराम देण्यासाठी प्रत्येक गणेश भक्ताने अगोदर मागणी न करता केवळ चिकण मातीची आपण मूर्तीचे पूजन करणार असं जर मनात ठरवलं तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाहेरून येणारच नाही असे आमदार जित आरोलकर म्हणाले.

clay Ganpati artists
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील वाहतूकीत बदल

मांन्द्रे मतदार संघातील अनेक मूर्तिकार चिकण माती पासून तयार करणारे आहेत. त्या मूर्तिकारांना योग्य वेळी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे बाहेरच्या मूर्ती आणल्या जातात. त्यावर मात करण्यासाठी आता सरकारच्या सहकार्यातून चिकण माती पासून त्याचे व्यवस्थित गोळे करणे त्यासाठी लागणारे यंत्र सरकारच्या हस्तकला महामंडळामार्फत वितरित केले.

त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि ज्या पंचायत क्षेत्रात जी यंत्रणे दिलेली आहे. ते इतर मूर्तिकारांना त्या त्या वेळी उपलब्ध करून द्यावे. असे आवाहन आमदार जित आरोलकर यांनी केले. यावेळी पार्से, हरमल, आणि मोरजी अशा कलाकारांना यंत्रे वितरित केली.

यावेळी मूर्तिकार श्री साळगावकर, बांदेकर यांनी समाधान व्यक्त करताना या पूर्वीच्या सरकारने अशी कोणतीच कलाकारांना यंत्र देण्याची योजना राबवली नव्हती. परंतु आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी आणि हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांच्यामार्फत ही यंत्रणे देऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसाय वाढीस लावण्यासाठी ही योजना आखल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पार्से पंच सदस्या सुनिता बुगडे देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की यापूर्वीच्या सरकारने तशा प्रकारची योजना आखली नव्हती. परंतु मांद्रे मतदारसंघातील आमदार जीत आरोलकर हे युवा आमदार आहेत आणि त्यांना नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत याची जाणीव आहे. त्या नजरेतून त्याने हे काम केलेले आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांना आम्ही पाठिंबा याहीपुढे देऊया असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com