Ganesh Festival Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Goa: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्‍या घरीही गणेश चतुर्थीचा उत्‍साह!

Fatorda: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या घरी गणेश चतुर्थी उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आले

दैनिक गोमन्तक

Ganesh Festival: गोव्यात घरगुती गणपतीचा उत्सव दीड दिवसांचा असतो, मात्र उत्साह अमाप असतो. मडगावचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या घरी गणेश चतुर्थी उत्सवाचे आयोजन अशाच मोठ्या उत्साहाने करण्यात आले.

या उत्सवानिमित्त कामत यांचे आके येथील घर तीन दिवस गजबजून गेले होते. कामत यांच्या असंख्य समर्थकांनी त्यांच्या घराला भेट देऊन श्री गजाननाचे दर्शन घेतले. त्यांची सरबराई करण्यात त्यांचे सर्व कुटुंब व्यस्त होते. या उत्सवानिमित्ताने लोक आमच्या घरी आवर्जून भेट देतात. त्यांचे हे प्रेम ऊर भरवणारे असते अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्यक्त केली.

गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी सकाळी पुरोहिताकडून गणपती स्थापना आणि पूजनाचा धार्मिक विधी आटोपण्यात आला. या निमित्ताने सायंकाळी श्री सत्यनारायण पूजाही झाली. या दीड दिवसांच्या गणेश पूजनात त्यांच्या पत्नी आशा कामत, पुत्र योगीराज व कुटुंबाच्या इतर सदस्यांनी सहभाग घेतला. रात्री त्याच उत्साहात श्रींचे विसर्जन करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT